मुंबई

पर्युषण काळात मांसविक्री आठ दिवस बंद ठेवावी

CD

पर्युषण काळात मांसविक्री आठ दिवस बंद ठेवा!
भाईंदरमधील भाजप नगरसेवकाची वादग्रस्त मागणी

भाईंदर, ता. ३ (बातमीदार) : जैन धर्मीयांच्या आगामी पर्युषण पर्व कालावधीत मांसविक्रीची दुकाने आठ दिवस बंद ठेवावी, अशी वादग्रस्त मागणी मिरा-भाईंदरच्या भाजप नगरसेवकाने केली आहे. यावरून पुन्हा एकदा नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.
जैन धर्मात सर्वात पवित्र मानला जाणारा पर्युषण पर्वकाळ ८ ते १६ सप्टेंबरदरम्यान आहे. या कालावधीत मिरा-भाईंदर शहरातील सर्व मांस व मटणविक्रीची दुकाने आठ दिवस बंद ठेवण्याबाबत प्रशासनाकडून आदेश काढण्यात यावेत, अशी लेखी मागणी भाजपचे भाईंदर पश्चिम येथील नगरसेवक भरत कोठारी यांनी आयुक्तांकडे केली आहे. जैन समाजाच्या धार्मिक भावना, अहिंसेचा संदेश व जीवदयेची भावना यांचा सन्मान राखण्यासाठी प्रशासनाकडून सकारात्मक सहकार्य मिळेल, अशी अपेक्षा कोठारी यांनी व्यक्त केली आहे.
वास्तविक सरकारी आदेशानुसार पर्युषण काळात दोनच दिवस मांसविक्रीची दुकाने बंद ठेवायची आहेत. असे असताना कोठारी यांनी आठ दिवस दुकाने बंद ठेवण्याची मागणी केल्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. काही वर्षांपूर्वी भाजपने बहुमताच्या जोरावर पर्युषण काळात आठ दिवस मांसविक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय महासभेत मंजूर केला होता. त्यावरून मोठा वाद पेटला होता व त्याचे पडसाद देशभर उमटले होते. राजकीय पक्षांनी या निर्णयाविरोधात तीव्र आंदोलनेदेखील केली होती. त्यानंतर भाजपला सारवासारव करावी लागली होती. असे असताना आता पुन्हा एकदा भाजपच्याच नगरसेवकाकडून ही मागणी पुढे आली असल्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
-------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Illegal Road Block: ९ कोटींच्या डांबरी रस्त्यावर बेकायदेशीर माती-दगडांचे ढिगारे; दुचाकीस्वार गंभीर जखमी, पीएमआरडीए निष्क्रिय

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा; कार्यकर्त्यांनी अंगावर पेट्रोल ओतून घेतले, दीड तास रास्ता रोको

Marathi News Live Updates: जरांगे पाटलांच्या शिष्टमंडळासोबत सरकारच्या प्रतिनिधींची चर्चा

रोहित शर्माचे भवितव्य ते अजित आगरकरांची गैरहजेरी... BCCI च्या Meeting मध्ये नेमकं काय घडलं?

अय्यो! टॉक्सिल'ला मागे टाकणाऱ्या 'हनुमान अंश'मध्ये झळकतेय मराठमोळी अभिनेत्री; सध्या स्टार प्रवाहवर करतेय काम, कोण आहे ती?

SCROLL FOR NEXT