मुंबई

बनावट कंपन्यांच्या माध्यमातून ५०० कोटी परदेशात!

CD

बनावट कंपन्यांच्या माध्यमातून ४९५ कोटी परदेशात!
भाईंदरमध्ये सीएविरोधात गुन्हा; आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास

भाईंदर, ता. ८ (बातमीदार) : बनावट कंपन्यांच्या माध्यमातून सुमारे ४९५ कोटी ३० लाख रुपयांचा निधी बेकायदा परदेशात पाठविल्याचा प्रकार भाईंदरमध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी भाईंदर येथील चार्टर्ड अकाउंटंट (सीए) महेंद्र पुरोहित यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

आयकर विभागाकडून देशभरात आर्थिक व्यवहारांची तपासणी सुरू आहे. त्याच मोहिमेअंतर्गत पुरोहित यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली. आयकर विभागाने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, २०२२ ते २०२६ या कालावधीत पुरोहित यांनी ३० बनावट (शेल) कंपन्यांच्या माध्यमातून ४९५ कोटी ३० लाख रुपयांचा निधी भारताबाहेर पाठविण्यास मदत केली.

परकीय चलनाच्या नुकसानीचा ठपका
या कंपन्यांची कागदपत्रे, लेखा पुस्तके, हिशेबाची नोंदवही किंवा करारपत्रांची पुरोहित यांनी पडताळणी केली नसल्याचा आरोप आहे. निधी परदेशात पाठविणाऱ्या कंपन्यांना बनावट प्रमाणपत्रे देण्यासही त्यांनी मदत केल्याचे तक्रारीत नमूद आहे. तपासात संबंधित संस्था बनावट असल्याचे आढळून आल्याचा दावा आयकर विभागाने केला आहे. या व्यवहारांमुळे देशाच्या परकीय चलन साठ्याचे नुकसान होऊन आर्थिक स्थैर्य आणि अखंडतेला धोका निर्माण झाल्याचा ठपका आयकर विभागाने ठेवला आहे. प्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२८ वर्षांनंतर भारतीय क्रिकेट इतिहासात घडणार दुर्मिळ क्षण? एकाच दिवशी दोन देशात कसे खेळणार भारतीय संघ

Vadodara Mumbai Expressway : महाराष्ट्रातून दिल्ली अन् जयपूर गाठणे होणार सोपे! वडोदरा-मुंबई एक्सप्रेसवेचा 'हा' मार्ग वाहतुकीसाठी सज्ज; PM मोदींच्या हस्ते उद्घाटन

नालासोपारा ZP शाळेत कुकरचा स्फोट; भडका उडताच गरम खिचडी चिमुकल्यांच्या अंगावर; 2 विद्यार्थ्यांसह महिला जखमी

नारकरांच्या घरी झाली सत्यनारायण पूजा; ऐश्वर्या यांनी स्वतः बनवला प्रसादाचा शिरा, कशी केली तयारी? दाखवला खास व्हिडिओ

Hartalika 2026: हरतालिकेच्या दिवशी ‘या’ 3 राशींवर होणार महादेव पार्वतीची विशेष कृपा; धनलाभाचे संकेत

SCROLL FOR NEXT