रेकी करून सशस्त्र दरोडे
पाच जणांच्या टोळीला अटक
भाईंदर, ता. १७ (बातमीदार) : सशस्त्र दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीला मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांनी अटक केली. माणिकपूर आणि काशीगाव पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. आरोपींकडून दोन देशी पिस्तुले, चार धारदार चाकू तसेच दरोड्यासाठी वापरण्यात येणारी अन्य हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.
माणिकपूर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी काशीगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत सशस्त्र दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती माणिकपूर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पथकाने शोध सुरू केला. संशयास्पद कारमधून पाच जणांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता, तिघांना पकडण्यात यश आले; मात्र दोघे कार घेऊन पसार झाले. पळून जाताना आरोपींनी एका पादचाऱ्याला कारची धडक दिली. त्यात तो जखमी झाला. त्यानंतर आरोपींनी कार घटनास्थळीच सोडून पळ काढला. पोलिसांनी तपास करून पसार झालेल्या दोघांनाही अटक केली. शहानवाज इकराम कुरेशी, नौशाद इकराम कुरेशी, पप्पू हनीफ कुरेशी, इम्रान अब्दुल रहीम कुरेशी आणि इरफान बाबू कुरेशी, अशी आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
---
ईडीचे अधिकारी असल्याचे सांगत रेकी
आरोपी चोरी करावयाच्या परिसराची आधी रेकी करत होते. त्यानंतर दिवसा वॉचमनची नजर चुकवून दरोडा टाकत होते. चोरी करताना घरातील सदस्य समोर आल्यास आपण सीबीआय, सीआयडी किंवा ईडीचे अधिकारी असल्याचे सांगून तेथून निघून जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपींनी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर तसेच गुजरातमध्ये रेकी केल्याचेही समोर आले आहे. आरोपींवर विविध राज्यांत गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.