मुंबई

आधी लाभ, मग विस्तार

CD

आधी लाभ, मग विस्तार

भुयारी गटार योजनेचा प्रस्ताव १६ ऑक्टोबरला महासभेत

भाईंदर, ता. १२ (बातमीदार) : मिरा-भाईंदर शहारात सुरू असलेल्या भुयारी गटार योजनेच्या पहिल्या टप्प्याचा लाभ अजूनही सर्व रहिवासी सोसायट्यांना मिळायला सुरुवात झालेली नाही. असे असताना आता योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची तयारी महापालिकेने सुरू केली असून, त्यावर तब्बल पाचशे कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या टप्प्यात शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही योजना राबविण्यात येणार आहे.

मिरा-भाईंदरमध्ये २००९ पासून भुयारी गटार योजनेचे काम सुरू आहे. या योजनेवर आतापर्यंत सुमारे ८०० कोटी रुपये खर्च झाले आहेत, मात्र काम अद्याप पूर्ण झालेले नाही. महापालिका गेल्या १५ वर्षांपासून नागरिकांकडून कर वसूल करत असली, तरी केवळ आठ ते १० टक्के रहिवासी इमारतींनाच योजनेचा लाभ मिळाला आहे. उर्वरित इमारतींमधील सांडपाणी वाहिन्या मलवाहिन्यांना जोडण्याचे काम अद्याप बाकी आहे. दुसरीकडे, पहिल्या टप्प्यातील योजनेच्या देखभाल-दुरुस्तीवरही कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत.

पहिल्या टप्प्यात राई, मुर्धा, मोर्वा ते उत्तन तसेच चेणा आणि काजूपाडा या ग्रामीण भागांचा समावेश करण्यात आला नव्हता. या भागांत योजना राबविणे शक्य नसल्याचे कारण त्या वेळी देण्यात आले होते. आता दुसऱ्या टप्प्यात या भागांचाही समावेश करण्याचे नियोजन असून, त्यासाठी ५०० कोटी रुपयांचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. हा प्रस्ताव महासभेच्या मंजुरीसाठी मांडला जाणार आहे.

आधी लाभ देण्याची मागणी
पहिल्या टप्प्यातील योजनेचा लाभ बहुतांश इमारतींना मिळालेला नसताना दुसऱ्या टप्प्यावर खर्च करण्याच्या तयारीला काँग्रेसचे वरिष्ठ नगरसेवक अनिल सावंत यांनी आक्षेप घेतला आहे. प्रशासनाने आधी पहिल्या टप्प्यातील योजनेचा लाभ नागरिकांना द्यावा आणि त्यानंतरच विस्ताराचा विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली.

पहिल्या टप्प्यातील योजनेचा इमारतीना अजूनही लाभ मिळत नाही, मात्र त्याच्या देखभाल दुरुस्तीवर कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत. त्यामुळे प्रशासनाने पहिल्या टप्प्याच्या योजनेचा आधी लाभ द्यावा. नंतर दुसऱ्या टप्प्याचा विचार करावा.
- अनिल सावंत, वरिष्ठ नगरसेवक, काँग्रेस

या विषयावर महासभेत सर्व नगरासेवकांशी चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल.
- ध्रुवकिशोर पाटील, उपमहापौर

-----------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: 'जंतर-मंतर'चा इतिहास काय? आंदोलनाचं ठिकाण कधीपासून बनलं, त्यापूर्वी काय व्हायचं; आता तीन पर्याय कोणते?

Shivsena UBT Leader Resign: ठाकरे गटाला मोठा धक्का! बड्या नेत्यानं तडकाफडकी दिला राजीनामा

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींसह INDIA आघाडीचे ८ नेते सुप्रीम कोर्टाच्या दिशेने रवाना; याचिका दाखल करणार

सर, मला अन् मित्राला वडा पाव हवाय; शाळकरी मुलाची विनंती, तुकाराम मुंढे काय म्हणाले ऐका... Video Viral

Yashasvi Jaiswal ला यष्टिरक्षण का करावसं वाटतंय? हे भलतंय खूळ डोक्यात येण्याचं कारण, घ्या जाणून...

SCROLL FOR NEXT