मुंबई

मिरा-भाईंदरला स्वतंत्र वाहतूक पोलिस उपायुक्त

CD

भाईंदर, ता. ५ (बातमीदार) : मिरा-भाईंदर शहरातील वाढती वाहतूक समस्या लक्षात घेऊन राज्य सरकारने शहरासाठी स्वतंत्र वाहतूक उपायुक्त पद मंजूर केले आहे. आमदार नरेंद्र मेहता यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यासंदर्भात पत्रव्यवहार केला होता. या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस महासंचालक यांना आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार ३ नोव्हेंबरला स्वतंत्र पोलिस उपायुक्त पदाच्या निर्मितीला अधिकृत मंजुरी देण्यात आली.

एकीकडे शहराची लोकसंख्या सातत्याने वाढत असताना वाहनांच्या संख्येतही मोठी वाढ होत आहे. त्यामुळे वाहतुकीची समस्या गंभीर होऊ लागली असून, नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर शहराचे वाहतूक व्यवस्थापन अधिक सक्षम करणे आवश्यक बनले आहे.

दुसरीकडे शहराच्या एका बाजूला मुंबई, दुसऱ्या बाजूला ठाणे व तिसऱ्या बाजूला वसई-विरार शहर आहे. त्याचप्रमाणे शहरातून मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गदेखील जात आहे. त्यामुळे वाहनांच्या संख्येत आणखीन भर पडत आहे.

वाहतूक कोंडीवर नियंत्रण
या निर्णयामुळे मिरा-भाईंदर परिसरातील वाहतूक नियोजन, वाहतूक कोंडीवर नियंत्रण, वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी तसेच अपघातप्रवण ठिकाणी उपाययोजना करण्यास अधिक बळ मिळण्याची अपेक्षा आहे, असे मत मेहता यांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought Relief : ७३ लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी ५ हजारांची मदत - फडणवीसांची माहिती; उर्वरितांना दोन दिवसांत रक्कम मिळणार

Satara Farmer Loan Waiver: सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा! ३४ हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ, चौथी यादी जाहीर

Navi Mumbai: माजी मंत्र्याचा अनधिकृत कारभार? मोरबे धरण क्षेत्रात अलिशान फार्म हाऊसची उभारणी, नवा वाद पेटण्याची शक्यता

Latest Marathi News Live Update : जंतरमंतर किंवा इतर कोणत्याही ठिकाणी तिरंगा फडकवणे गुन्हा मानला जाऊ नये - आशुतोष रांका

IPL 2027 Trade: चेन्नई सुपर किंग्सने हार्दिक पांड्याला 'ठेंगा' दाखवला; SRH चे दोन तगडे खेळाडू आपल्या संघात घेतले, त्याबदल्यात कोणाला दिले?

SCROLL FOR NEXT