मुंबई

अव्वल स्थानावरून मिरा-भाईंदर पालिकेची गच्छंती

CD

भाईंदर, ता. १२ (बातमीदार) : गेल्या वर्षी स्वच्छ सर्वेक्षणात देशात अव्वल ठरलेल्या मिरा-भाईंदर महापालिकेला या वेळी आपला लौकिक कायम ठेवण्यात अपयश आले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या स्वच्छ सर्वेक्षणाच्या निकालात महापालिकेला पहिल्या तीन क्रमांकातही स्थान गाठता आलेले नाही.

भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्रालय यांच्यातर्फे आयोजित स्वच्छ सर्वेक्षण २०२४ च्या पुरस्कार वितरण सोहळ्यात मिरा-भाईंदर महापालिकेची निवड ‘तीन ते १० लाख लोकसंख्या’ श्रेणीतील सर्वोत्तम शहर म्हणून झाली होती. तब्बल चार हजार शहरांमधून महापालिकेने पहिला क्रमांक पटकावला होता. नवी दिल्लीतल्या विज्ञान भवन येथे झालेल्या समारंभात राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महापालिकेला हा पुरस्कार मिळाला होता. एवढेच नाहीतर महापालिकेच्या या कार्याची दखल डेहराडून महापालिकेकडूनदेखील घेण्यात आली. मिरा-भाईंदरमधील शहर स्वच्छतेचे कार्य कशा पद्धतीने चालते, याची डेहराडून महापालिकेच्या महापौर व अयुक्तांनी गेल्यावर्षी मिरा-भाईंदरला भेट देत पाहणी केली. शहरातील विविध स्वच्छता प्रकल्प, आधुनिक कचरा व्यवस्थापन तंत्रज्ञानसह शहरात राबवले जाणारे स्वच्छतेचे नाविन्यपूर्ण उपक्रम याविषयी त्यांनी माहिती घेतली होती.

या पार्श्वभूमीवर २०२५ च्या स्वच्छ सर्वेक्षणात पहिले स्थान कायम ठेवण्याचे मोठे आव्हान मिरा-भाईंदर महापालिकेसमोर होते. शिवाय पहिल्या तीन क्रमांकात येऊ, अशी महापालिकेला अपेक्षादेखील होती, मात्र बुधवारी (ता. ११) जाहीर झालेल्या निकालामध्ये मिरा-भाईंदर शहराचे नाव पहिल्या तीन क्रमांकामध्येदेखील समाविष्ट नव्हते. एवढेच नव्हे तर गेल्या वर्षी मिळालेला वॉटर प्लस सिटी हा पुरस्कारदेखील मिळवण्यात महापालिकेला यंदा अपयश आले आहे.

मागील वर्षांत कामगिरीत सुधारणा
देशात स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या वर्षी मिरा-भाईदरला ३० वे स्थान मिळाले होते. त्यानंतर प्रत्येक वर्षी आपल्या कामागिरीत सुधारणा करत महापालिकेने अनुक्रमाने सातवा, तिसरा क्रमांक पटकावत, गेल्या वर्षी पहिल्या क्रमांकावर झेप घेतली होती, मात्र यावर्षी महापालिकेला शहर स्वच्छतेत अपेक्षित कामगिरी गाठण्यात अपयश आले आहे.

स्वछतेच्या बाबतीत मिरा-भाईंदर महापालिकेने वर्षभर सातत्यपूर्ण काम केले आहे. सर्वेक्षणाचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यात पहिल्या तीनमध्ये महापालिकेचे नाव नाही, मात्र महापालिकेला चांगली क्रमवारी मिळेल, अशी खात्री आहे.
- डॉ. सचिन बांगर, अतिरिक्त आयुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईला उडवणाऱ्या धमक्यांचे सत्र सुरूच, पुन्हा बॉम्बची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर

Novaya Gazeta: ६ पत्रकारांची हत्या, ३३ वर्षांचा संघर्ष; रशियातील शेवटचे मोठे स्वतंत्र वृत्तपत्रही बंद

Latest Marathi News Live Update : धक्कादायक! राज्यात अवघ्या ७ महिन्यांत रस्ते अपघातात ९,१९५ जणांचा मृत्यू

Pune Cyber Crime: बनावट अटक वॉरंट, व्हिडिओ कॉल आणि धमक्या; पुण्यातील वृद्ध महिलेची 32 लाखांची फसवणूक

विनयभंगानंतर तरुणीला लोकलखाली ढकलल्याचा आरोप; नायगाव स्थानकातील धक्कादायक घटना|Naigaon | Mumbai news

SCROLL FOR NEXT