मुंबई

माथेरानच्या मालडुंगा पॉईंटवर भूस्खलन

CD

माथेरान, ता. २६ (बातमीदार) ः गेल्‍या काही दिवसांपासून सुरू असलेल्‍या अतिवृष्‍टीमुळे माथेरान घाटरस्‍त्‍यावर दोनदा दरड कोसळण्याच्या घटना घडल्‍या आहेत. शहरातील मालडुंगा पॉइंटवर भूस्खलन झाल्‍याने रस्त्याचा काही भाग खचला. पावसाचा जोर वाढल्‍याने डोंगरावरून लाल मातीसह येणारे पाणी पनवेलच्या दिशेने वाहत आहे. दरम्यान हा पॉईंट पर्यटकांसाठी बंद केला असून कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
माथेरानमध्ये पर्यटकांना पाहण्याकरिता एकूण ३८ पॉईंट्स आहेत. सनसेट पॉईंट आणि मंकी पॉईंटच्या मधोमध मालडुंगा पॉईंट आहे. याठिकाणी जाणाऱ्या पायवाटेतील काही भाग खचला असून मुसळधार पावसामुळे पाणी जाण्याचा मार्ग बंद झाल्याने भूस्खलन झाले असावे, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. येथील डोंगर ठिसूळ असून दगडांचे प्रमाण कमी आहे. मुरूम, माती अधिक असल्‍याने अतिवृष्‍टीत ते ढासळतात.
दोन दिवसांपासून पावसाच्या पाण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात माती वाहून जात असून रस्‍ता खचला आहे. जंगलातील काही झाडेही उन्मळून पडली असून वनराईचे नुकसान झाले आहे.
भूस्खलन झाल्याची माहिती मिळताच नगरपालिकेचे अभियंता अभिमन्यू येळवंडे, लेखापाल तथा पालिका अधीक्षक अंकुश इचके, पर्जन्यमापक निरीक्षक अन्सार शेख, स्वच्छता निरीक्षक नरेंद्र सावंत आदींनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली आणि हा पॉईंट पर्यटकांसाठी बंद केला असून कर्मचारी तैनात केले आहेत.

मंकी पॉईंट सुरक्षित
माथेरानमध्ये मंकी पॉईंट येथे दरडी कोसळण्याच्या बातम्या काही वृत्त वाहिन्यांनी प्रसारित केल्या आहेत, त्या बातमीमध्ये काही तथ्य नसून मंकी पॉईंट सुरक्षित असून मालडुंगा पॉईंडवर थोड्या फार प्रमाणात भूस्खलन झाल्‍याचे प्रशासनाकडून स्‍पष्‍ट करण्यात आले आहे.

वनराईचे नुकसान
मालडुंगा पॉईंट माथेरानच्या पश्चिमेला असून या भागात कोणतीही वस्ती नाही. त्‍यामुळे भूस्‍खलनात कोणतीही जीवित वा वित्‌त हानी झालेली नाही, मात्र हा भाग वनराईचा असल्‍याने झाडांचे नुकसान झाले आहे.

माथेरानच्या मालडुंगा पॉईंट भागात जमीन खचली आहे. ही माहिती मिळताच पथकासह घटनास्थळी पाहणी करून योग्य त्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. हा पॉईंट सुरक्षेच्या कारणास्तव रहदारीसाठी बंद करण्यात आला आहे.
- अभिमन्यू येळवंडे, अभियंता,माथेरान नगरपरिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT