मुंबई

VIjayadashmi: अश्वमालकांकडून पोशिंद्याला दसऱ्याचा मान, माथेरानमध्ये विजयादशमीला आगळेवेगळे महत्त्व

CD

माथेरान, ता.२४ (बातमीदार)ः विजयादशमीच्या दिवशी पूर्वापार चालत आलेली अश्वपुजनाची परंपरा आजही माथेरानमध्ये जपली जात आहे. कारण वाहनांना बंदी असल्याने शहरातील ४० टक्के लोकांचा उदरनिर्वाह हा पर्यटनावरच आहे. त्यामुळे घोड्यापासून मिळणारे उत्पन्न हेच घरातील प्रमुख स्रोत असल्याने घराच्या पोशिंदा प्रतीची आपुलकी जपली जात आहे.

साढेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या विजयादशमी घोडेवाल्यांसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस असतो. या दिवशी सकाळी घोड्याचा तबला स्वच्छ धुऊन चकाचक केला जातो. काही अश्वमालक तबेल्यांमध्ये रांगोळी काढतात. तसेच घोड्यांना बाहेर काढल्यानंतर गृहिणींकडून त्याची यथोचित पूजा केली जाते. पूजनानंतर घोड्याला त्याच्या आवडीचे खाद्य दिले जाते. यावेळी काही घोड्यांवर झुल तर काही घोडे फुलांनी तर काही घोड्याच्या केसांना वेणी बांधून फुग्यांनी सजवले जात असल्याने अश्वपूजनचा हा सोहळा पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे.

विजयादशमीला आगळेवेगळे महत्त्व
१९९५ अगोदर जास्त पाऊस आणि दळणवळण नसल्याने माथेरानमध्ये पर्यटकांचा वानवा होता. यामुळे व्यवसाय नसल्याने घोडा तबेल्यातच बांधला जात होता. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी पुन्हा व्यवसायासाठी हा घोडा तबेल्यातून बाहेर काढला जात होता. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी नवीन व्यावसायिक वर्षाची सुरुवात होत असल्याचे अश्वचालक मानतात. तसेच हा दिवस विजय दिन म्हणूनही साजरा करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT