मुंबई

Matheran: ट्रेकिंग करताना पाय घसरला अन् पडली थेट खोल दरीत.. ७ तासांच्या थरारक प्रयत्नानंतर रेस्क्यू टीमने सुखरूप वाचवलं!

CD

माथेरान, ता. ३ (बातमीदार) : माथेरानला लागूनच असलेल्या पेब किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेली महिला अचानक दरीत पडल्याची घटना शनिवारी (ता. २) सकाळी घडली. रेस्क्यू टीम आणि माथेरान पोलिसांच्या अथक परिश्रमाने महिलेला ७०० फूट खोल दरीतून काढण्यात यश आले.
माथेरान हे जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असल्याने नेहमी पर्यटक माथेरानमध्ये येत असतात. या पर्यटकांमध्ये ट्रेकिंगची आवड असणाऱ्या ग्रुपमध्ये एक महिला शनिवारी सकाळच्या सुमारास पेब किल्ल्याकडे ट्रेकिंग करत होती. त्या वेळी अचानक तिचा पाय घसरल्यामुळे ती ७०० फूट खोल दरीत पडली. दरीत पडूनसुद्धा ती महिला जिवंत होती.

दरीतून ‘वाचवा, वाचवा’ असा आवाज आल्यानंतर पेब किल्ल्यावर असणाऱ्या पुजाऱ्याने तिचा आवाज ऐकून पोलिसांना माहिती दिली. माथेरान पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शेखर लव्हे यांनी त्वरित सह्याद्री रेस्क्यू टीमला पाचारण केले. सह्याद्री रेस्क्यू टीमचे वैभव नाईक, सुनील कोळी, चेतन कळंबे, संदीप कोळी, महेश काळे, अक्षय परब, सुनील ढोले यांनी टॉर्चसह दुपारी १ वाजता सर्व रेस्क्यूचे साहित्य घेऊन थेट पेब किल्ला गाठला. सहायक पोलिस निरीक्षक गणेश गिरी, पोलीस नाईक घनश्याम पालवे, पोलिस शिपाई प्रशांत गायकवाड, दामोदर खतेले, वन विभागाचे कर्मचारी तसेच आदीवासी बांधव हेसुद्धा रेस्क्यू टीमच्या मदतीला होते.

सायंकाळी सहा वाजता आले यश
अंदाजे ७०० फूट खोल दरीत अडकून पडलेल्या महिलेला धीर देत रॅपलिंगचे दोर दरीत सोडून अतिशय कठीण जागेतून महिलेपर्यंत पोहचले. तिला धीर दिल्यानंतर दोरीला बांधून खोल दरीतून सुखरूप बाहेर काढले. सायंकाळी सहाच्या दरम्यान महिलेला मुख्य मार्गावर आणण्यात यश आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT