मुंबई

सावरकर-गोळवलकर चुकल्याबद्दल माफी मागा!

CD

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. २ : ‘अजितदादांनी माफी मागावी, अशी मागणी करणाऱ्‍या भाजपच्या लोकांनी सावरकर आणि गोळवलकर चुकले आहेत त्याबद्दल आधी माफी मागा. आमचे राजे काय स्त्रीलंपट होते का, असा प्रश्न करीत शिवपुत्र संभाजी राजे यांना स्त्रीलंपट आणि दारूड्या म्हणणाऱ्यांना आपण आपले आदर्श मानत आहात; त्यांच्याबद्दल आपले काय म्हणणे आहे, हे अजितदादांवर टीका करणाऱ्यांनी जाहीरपणे सांगावे’, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केले.

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजे ‘धर्मवीर’ नव्हते तर स्वराज्य रक्षकच होते असे विधान केले. त्यानंतर भाजप आणि शिंदे गटाने तात्काळ आक्षेप घेत आंदोलने केली. त्यावरून आव्हाड यांनी ऐतिहासिक दाखले देत अजित पवारांवर टीका करणाऱ्यांवर निशाणा साधला. गेले काही दिवस छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत वापरल्या जाणाऱ्या स्वराज्यरक्षक आणि धर्मवीर या शब्दांवरून बरीच वादावादी झाली आहे. खरे तर निष्कारण हा वाद काढण्यात आला. रयतेच्या राजाचे वारसदार छत्रपती संभाजी राजे हे होते. त्यामुळे ते कुठल्या एका धर्माच्या रक्षणासाठी बाहेर पडले असे कोणतेही ऐतिहासिक संदर्भ नाहीत, असे आव्हाड म्हणाले.

कमी माहितीच्या आधारावर आपण जेव्हा एखाद्याला कोंडीत पकडायला जातो, तेव्हा तो कोंडीत पकडला जात नाही, तर इतिहासाची पाने बाहेर येतात. जर सगळं शांत असतं तर आम्ही गोळवलकर आणि सावरकर यांची ही पाने बाहेर काढलीच नसती, असेही आव्हाड यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: अजिंक्य रहाणेच्या KKR संघाला पुन्हा मोठा धक्का! गंभीरचा लाडका पठ्ठ्या संपूर्ण हंगामातूनच झाला बाहेर

Why Leopard Enters Villages : काळजाचा ठोकाच चुकला! अंगणात भांडी घासताना पुढ्यातच उभा राहिला बिबट्या; त्याला बघून युवती पडली बेशुद्ध, साताऱ्यातील थरारक घटना

Latest Marathi News Live Update : भांडुप स्टेशन रोडवरील तीन दुकानांना भीषण आग, परिसरात धावपळ

Shivaji University : विद्यापीठ कॅम्पसमधील ‘भूजल’ धोक्यात; सांडपाणी जमिनीत मुरविणे घातक, अधिसभा सदस्यांची प्रशासनाविरोधात नाराजी

Pune Bengaluru Highway Accident : कापड दुकानात करत होता काम, घरी पत्नी होती गर्भवती..; नियतीनं म्हाकवेच्या सौरभला कसं हिरावून नेलं? पुणे-बंगळूर महामार्गावर काय घडलं?

SCROLL FOR NEXT