मुंबई

कर्तव्यदक्ष पोलिसांची आरोग्य तपासणी

CD

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ४ : सण, उत्सव असो किंवा इतर काही कार्यक्रम नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र पोलिस कर्तव्य बजावत असतात. नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घेणाऱ्या पोलिसांचे आरोग्य उत्तम राहणे आवश्यक असल्याने महात्मा फुले चौक पोलिसांनी सोमवारी आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. पोलिस ठाण्यातील सुमारे १२५ पोलिसांनी या वेळी आरोग्य तपासणी करून घेतली.

कायदा सुव्यवस्थेचे रक्षण करताना, गुन्ह्यांचा तपास, आंदोलने, मोर्चे, व्हीआयपींचे दौरे, गस्त, सण, नवीन वर्षाचा जल्लोष यामुळे पोलिस समाजाचे रक्षण करण्यासाठी २४ तास कर्तव्य निभावत असतात. या कारणाने त्यांना आरोग्याची काळजी घेता येत नाही. या सर्व गोष्टींचा विचार करून यंदा कल्याण महात्मा फुले पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक हुनमाणे यांही पोलिस ठाण्यातच युनिकेअर हेल्थ सेंटर यांनी मदतीने आरोग्य शिबिर आयोजित केले. या शिबिरात जवळपास १२५ पोलिसांनी सहभाग घेत आरोग्य तपासणी करत आरोग्याची काळजी घेण्याचे ठरवले. ३१ डिसेंबर व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी चोवीस तास तैनात असलेल्या पोलिसांनी या उपक्रमाचे स्वागत केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Rate Hike: पेट्रोल ₹5 तर डिझेल 3 रुपयांनी महाग! नवे दर लागू; महाराष्ट्रात 1 लिटर आता कितीला?

Mumbai News: ठाणे-बेलापूर मार्गावर चार रात्री वाहतूक बंद, काय असतील पर्यायी मार्ग?

‘सोबत राहा, महिन्याला स्टायपेंड देतो’; विवाहित निर्मात्याची रेणुका शहाणेंना विचित्र ऑफर, प्रस्ताव ऐकून अभिनेत्रीला बसला धक्का

Latest Marathi News Live Update : ठाकरे बंधूंच्या 'गर्जना' मोर्चाला शेकापचा पाठिंबा

Dudhna Dam : निम्न दुधना’तून पाणी उपशावर बंदी साठा २० टक्क्यांपेक्षा कमी, प्रशासन ॲक्शन मोडवर

SCROLL FOR NEXT