मुंबई

फसवणुकीप्रकरणी मुख्य आरोपीस अटक

CD

अंधेरी, ता. ४ (बातमीदार) ः सुमारे ७२ लाख रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी राघवेंद्र हरिश्‍वर पुजारी या मुख्य आरोपीस समतानगर पोलिसांनी अटक केली. फ्लॅट खरेदी-विक्रीचे बोगस दस्तावेज बनवून त्याने एलआयसीकडून कर्ज घेऊन फसवणूक केल्याचा त्‍याच्‍यावर आरोप आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलिस कोठडी सुनावली आहे. निखिल अंबू गोलाणे हे चालक म्हणून काम करतात. ते सध्या त्यांची वयोवृद्ध आई, पत्नी आणि मुलांसोबत कांदिवलीतील लोखंडवाला कॉम्प्लेक्स, म्हाडा, आकुर्ली गोल्डन पॅलेस अपार्टमेंटमध्ये राहतात. हा फ्लॅट त्यांच्या वडिलांच्या नावावर आहे. याच फ्लॅटसंदर्भात ही फसवणूक झाली होती. हा प्रकार उघडकीस येताच निखिल गोलाणे यांनी समतानगर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी बोगस दस्तावेज बनवून पैशांचा अपहार करून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला होता. याच गुन्ह्यात सहा महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या राघवेंद्र पुजारीला समतानगर पोलिसांनी अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

France vs Senegal : किलियन एमबापेने मोडला मेस्सीचा विक्रम अन् नोंदवले २ वर्ल्ड रेकॉर्ड; मुंबईपेक्षा लहान देशाची फ्रान्सला कडवी टक्कर

Operation Tiger: उद्धव ठाकरेंचे 'हे' सहा खासदार दिल्लीत दाखल?, शिंदे दिल्लीकडे रवाना, उद्या लोकसभा अध्यक्षांची होणार भेट?

Pune News : नाट्यगृहाच्या आरक्षणासाठी ॲप अनिवार्य करणार; स्थायी समितीचा निर्णय

Vantara Confirms Madhuri Elephant Return Kolhapur : 'कोल्हापूरकर आम्ही माधुरी हत्तीला पाठवतोय'; वनताराने अखेर दिली कबुली; व्हिडिओ केला सादर

Uruli Kanchan Blood Donation : उरुळी कांचनमध्ये ड्रीम्स युवा फाउंडेशनचे विक्रमी ८०६ पिशव्या रक्तदान

SCROLL FOR NEXT