मुंबई

पालघरमध्ये सावित्रीच्या लेकींचा गुणगौरव

CD

पालघर, ता. ४ (बातमीदार) : मुलींच्या संगोपनाबरोबरच त्यांचे शिक्षणही महत्वाचे असून पालघर जिल्ह्यातील एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये याबाबत पालकांनीसुद्धा जागृत असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पालघर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी संगीता भागवत यांनी केले. क्रांतीज्योती प्रतिष्ठान पालघर आयोजित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ता सावित्रीच्या लेकी सन्मान सोहळा पंचायत समिती सभागृह पालघर येथे पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षणाधिकारी संगीता भागवत होत्या. सोहळ्याचे उद्‌घाटन पालघर पंचायत समितीच्या सभापती शैला कोलेकर करण्यात आले. यावेळी क्रांतीज्योती प्रतिष्ठान महाराष्ट्रचे अध्यक्ष निलेश भोईर, सचिव संघमित्रा भोईर, पालघर- ठाणे माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या संचालिका प्रगती पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

-------------------
महिलांचा सन्मान
शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या नमिता राऊत (बोईसर), अनिता वाढाण (पालघर), आश्लेषा माने (तारापूर), हेमलता ठाकूर (मनोर), नूतन राऊत (केळवे), अश्विनी बिराजदार (वसई), आशा निकम (सफाळे), प्रज्ञा ठाकूर (पालघर), शुभांगी पाटील (पालघर), संगीता चौधरी (डहाणू); तर उद्योग क्षेत्रातील कल्याणी बनसोडे, दर्शना पाटील (तारापूर), कृषी क्षेत्रातील हर्षाली माळी, व्यावसायिक क्षेत्रातील वैशाली डोहाळे, आरोग्य क्षेत्रातील कांचन ठाकरे, प्रमिला मानकर, पत्रकार विभागातून विभूती मिस्त्री, नीता चौरे या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना सावित्रीच्या लेकी हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रांतीज्योती प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश भोईर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जतिन कदम यांनी; तर मिलिंद चुरी यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Bushra Bano IPS? : 'अस्सलाम-अलैकुम' म्हटल्यामुळे IPS अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली? बंगालमधील 'त्या' व्हिडिओवरून गदारोळ

Fact Check : विराट कोहली २०२७ चा वन डे वर्ल्ड कप इंग्लंडसाठी खेळणार? भारतीय क्रिकेटला हादरवून टाकणाऱ्या वृत्तामागचे सत्य

Tata News: चंद्रशेखरन यांचा U-Turn? पुन्हा Tata चेअरमनपदी निवड! निर्णय होताच शेअर्स 5% वाढले; नेमकं काय घडलं?

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या टीमवर दुःखाचा डोंगर; लेखकाचं अकस्मात निधन, सचिन गोस्वामींची भावुक श्रद्धांजली

UPI MDR 2026 : अमेरिकेच्या दबावामुळे युपीआय वर एमडीआर? केंद्र सरकारने दिले स्पष्टीकरण; जाणून घ्या नेमकं प्रकरण

SCROLL FOR NEXT