मुंबई

ज्येष्ठांना पोलिसांचा मदतीचा हात

CD

प्रकाश लिमये, भाईंदर
ज्येष्ठ नागरिक हे कोणत्याही गुन्हेगारांचे सॉफ्ट टार्गेट असतात. रस्त्यात अथवा घरात एकटेदुकटे गाठून त्यांना लुबाडणे, एटीएम केंद्रात त्यांची फसवणूक करणे असे गुन्हे सर्रास घडतात. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना अशा गुन्ह्यांपासून स्वत:ला कसे वाचवायचे, गरज भासल्यास पोलिसांशी कसा संपर्क साधायचा, याचे मार्गदर्शन पोलिस स्थापना दिन सप्ताहानिमित्त ज्येष्ठ नागरिकांना मिरा रोड येथे देण्यात आले.
अनेक ज्येष्ठ नागरिकांना सकाळी अथवा सायंकाळी फिरायला जाण्याची सवय असते. अशा ज्येष्ठ नागरिकांवर पाळत ठेवून त्यांच्या गळ्यातील सोनसाखळ्या खेचून नेल्या जातात किंवा आपण पोलिस आहोत, पुढे एक गंभीर गुन्हा घडला आहे, तुमच्या अंगावरील सोन्याचे दागिने आमच्याकडे सुरक्षित ठेवा, अशी बतावणी करूनही ज्येष्ठ नागरिक लुबाडले जाते. तसेच घरात एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची घरे लुटल्याचे गुन्हे अनेक वेळा घडले आहेत. एटीएम केंद्रात पैसे काढायला गेलेल्या वरिष्ठ नागरिकांवर तर गुन्हेगारांचे विशेष लक्ष असते. एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना अनेक वेळा तांत्रिक अडचण येते. एटीएम कार्ड यंत्रात व्यवस्थित टाकले नाही, तर यंत्रातून पैसे बाहेर येत नाहीत. अशा वेळी मदत करण्याच्या बहाण्याने गुन्हेगार पुढे सरसावतात व शिताफीने हातचलाखी करून त्यांच्या बँक खात्यातून पैसे काढतात. ज्येष्ठ नागरिकांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचेही गुन्हे घडत असतात. गुन्हा घडल्यानंतर तत्काळ पोलिसांशी संपर्क कसा करायचा, याची माहिती ज्येष्ठ नागरिकांना नसते. त्यामुळे गुन्हेगार पसार होतात. अशा ज्येष्ठ नागरिकांनी सतर्क कसे राहावे, हे गुन्हे कसे घडतात, त्यातून फसवणूक होऊ नये, यासाठी काय खबरदारी घ्यावी, सकाळी - सायंकाळी फिरायला जाणाऱ्‍यांनी काय काळजी घ्यावी, यासंदर्भात पोलिसांकडून ज्येष्ठ नागरिकांना सविस्तर माहिती देण्यात आली.
...
संकटकाळी ११२ वर संपर्क साधा
पोलिसांशी तत्काळ संपर्क साधण्यासाठी डायल ११२ ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. या क्रमांकावर संपर्क साधल्यास अवघ्या काही मिनिटांत पोलिस घटनास्थळी दाखल होतात. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी या सुविधेचा अवश्य वापर करून पोलिसांची तत्काळ मदत मिळवावी, असे आवाहन पोलिसांनी यावेळी केले. ज्येष्ठ नागरिकांना येणाऱ्‍या अडचणी व त्यांच्या समस्याही पोलिसांनी यानिमित्त समजावून घेतल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT