मुंबई

कशेडी घाटात तीन वाहनांचा अपघात

CD

पोलादपूर, ता. ८ (बातमीदार) ः मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात अपघातांचे सत्र सुरूच असून शनिवारी सायंकाळी तिहेरी अपघात झाला. यात जीवितहानी झाली नसली तरी एकजण गंभीर जखमी झाला आहे.
महामार्गावरील कशेडी महामार्ग पोलिस मदत केंद्राचे हद्दीत अवघड वळणावर मुंबई-कांदिवली ते खेड जाणाऱ्या स्विफ्ट कारमधून चालक समीर अहमद चिकू (४९, रा. कांदिवली) व गहर नबीवानी (४३, रा. कांदिवली) असे प्रवास करीत होते. याचवेळी कशेडी गावाजवळ मोरबी, गुजरात ते गोवा असा प्रवास करणारा ट्रकचालक राम सुंदर पांडे (४५, रा. उत्तर प्रदेश) याचा ब्रेक न लागल्याने कारला मागून धडक दिली. त्‍यामुळे कारसमोर जाणारा कंटेनर मागील बाजूस आदळून ट्रकचालक रामसुंदर पांडे स्टेअरिंगमध्ये अडकला आणि गंभीर जखमी झाला. अखेर दुसऱ्या वाहनाच्या मदतीने साखळदंडाने बांधून केबिन ओढून चालकाला बाहेर काढण्यात आले. जखमी चालकाला कळंबणीतील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच, कशेडी महामार्ग पोलिस मदत केंद्राचे उपनिरीक्षक अनिल चांदणे, साहायक फौजदारांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य करत महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.

.................

कशेडी घाटात रुग्णवाहिका पलटी
वार्ड बॉय जखमी
पोलादपूर (बातमीदार) ः कशेडी घाटात शुक्रवारी मुंबईकडे जाणारी रुग्णवाहिका पलटी झाल्याची घटना घडली. रुग्णवाहिका चालक निखिल नवनाथ शिबिलकर (२८, रत्‍नागिरी) हा वॉर्डबॉय अमित मनोज जाधव (४०, रत्‍नागिरी याच्यासह रत्नागिरीहून ठाण्याकडे कोविड किट घेऊन जात होता. कशेडी दरम्‍यान चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्‍याने रुग्णवाहिका रस्त्यालगतच्या खड्ड्यात पलटी झाली. अपघातात वॉर्डबॉय अमितच्या हाताला दुखापत झाली. तर रुग्णवाहिकेचे नुकसान झाले.
घटनेची माहिती मिळताच, कशेडी महामार्ग मदत केंद्राचे पोलिस उपनिरीक्षक अनिल चांदणे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत जखमी वार्डबॉयला रुग्णालयात दाखल केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रसेलने स्टॉयनिस पाठोपाठ पूरनलाही धाडलं माघारी; लखनौचा निम्मा संघ गारद

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT