मुंबई

मनोरुग्ण महिलेची सुखरूप घरवापसी

CD

मानखुर्द, ता. ८ (बातमीदार) ः कर्नाटकातून बेपत्ता झालेल्या मरियम तबस्सुम या मनोरुग्ण महिलेला मानखुर्द पोलिसांनी तिच्या कुटुंबियांच्या ताब्यात देऊन सुखरूप घरवापसी केली. मागील महिन्यात ही महिला रात्रीच्या वेळी एकटीच शीव-पनवेल महामार्गालगत मानखुर्द पोलिसांच्‍या मोबाईल पाचच्‍या पथकाला आढळली होती.
न्यायालयाच्या आदेशाने तिला ठाणे येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मनोरुग्णालयातील परिचारिका प्रवीणा देशपांडे यांच्या मदतीने उपनिरीक्षक दिनेश शेळके यांनी तिच्या कुटुंबीयांविषयी माहिती मिळवली. चौकशीदरम्यान ती कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथील असल्याचे तिने सांगितले. त्या माहितीच्या आधारे उपनिरीक्षक दिनेश शेळके यांनी गुलबर्गा पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर वॉटसॲपच्या माध्यमातून माहितीची देवाणघेवाण करण्यात आली. खात्री झाल्यानंतर तिचा भाऊ मकसूद अली याला घेऊन गुलबर्गा पोलिस ठाण्याचे ठाणेदार गरुडाप्पा, महिला पोलिस शिपाई खाजाबी व शिपाई चंद्रकांत हे पथक मनोरुग्णालयात दाखल झाले. त्या ठिकाणी ओळख परेडमध्ये मरियमने भावाला ओळखले. त्यानंतर न्यायालयामध्ये कायदेशीर बाबींची पूर्तता केल्यानंतर तिला शनिवारी (ता. ७) भावाच्या ताब्यात देण्यात आले. दरम्‍यान, काही कारणास्तव तिचा घटस्फोट झाला होता. त्यामुळे बसलेल्या धक्क्यामुळे तिला मानसिक आजार जडल्‍याचे तपासातून समोर आले.

घटनाक्रम
एक महिन्यापूर्वी रात्री अकराच्या सुमारास मानखुर्द पोलिसांना मरियम सापडली.
तिच्या सुरक्षेच्या उद्देशाने पथकाने तिला ताब्यात घेतले व पोलिस ठाण्यात आणले.
शताब्दी रुग्णालयात तिची वैद्यकीय तपासणी केली.
जोगेश्वरी येथील सखी वन स्टॉप सेंटरमध्ये दाखल केले.
जे. जे. रुग्णालयात पुन्‍हा तपासणी केली.
त्या तपासणी अहवालासह तिला कुर्ला न्यायालयात हजर केले.
न्यायालयाने तिच्यावर मानसिक उपचारासाठी ठाणे येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल करण्याचे आदेश दिले.
त्या आदेशानुसार पथकाने तिला त्या ठिकाणी दाखल केले.
तेथील परिचारिका प्रवीणा यांच्या मदतीने माहिती घेऊन तिच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM kisan 22nd Installment : पंतप्रधान मोदी आज 'पीएम किसान' चा २२ वा हप्ता जारी करणार; तुमच्या खात्यात पैसे येणार की नाही? असं चेक करा

Phaltan News: पाइपमध्‍ये अडकून तिघांचा मृत्‍यू; फलटण तालुक्यातील पाेटपाटातील घटना, तिघेही ओरिसातील पाेल्‍ट्री कामगार, काय घडलं!

Dharashiv News: उमरग्यात गॅससाठी लांब रांगा; बुकिंग केल्यानंतरही १५ दिवस प्रतीक्षा;सिलिंडर उशिरा मिळत असल्याने ग्राहक त्रस्त

Parbhani Gas Booking Trouble: गॅस सिलिंडर बुकिंग सर्व्हर डाउन, ऑनलाइन नोंदणी ठप्प, परभणी गॅस एजन्सी गर्दी

बोर्डाचे शिक्षकांना आदेश! दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणी शाळेतच बंधनकारक; २१ दिवसांसाठी २१ दिवसांची मुदत, आता उत्तरपत्रिकांचे गठ्ठे इतिहासजमा

SCROLL FOR NEXT