मुंबई

उड्डाणपुलाखाली बेघरांची वस्ती

CD

घणसोली, ता. १० (बातमीदार)ः स्वच्छ सर्वेक्षणात पहिला क्रमांक मिळवण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने कंबर कसली आहे. याच अनुषंगाने शहरातील उड्डाणपुलाखालील जागा बंदिस्त करण्यात आल्या आहेत; पण घणसोलीत पालिकेच्या या प्रयत्नांना अपयश आले असून बेघरांनी केलेल्या घुसखोरीमुळे परिसराला बकाल स्वरूप आले आहे.
घणसोली - शिळफाटा उड्डाणपुलाला काही महिन्यांपासून बकाल स्वरूप आले आहे. या ठिकाणी बेघरांनी आश्रय घेतला असल्यामुळे नवी मुंबई महापालिकेच्या स्वच्छतेच्या प्रयत्नांनाच अपयश आले आहे. कारण एकीकडे नवी मुंबई महापालिका स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत विविध उपक्रम राबवत शहराच्या सौंदर्यात भर घालण्याचा प्रयत्न करत आहे; तर दुसरीकडे मात्र उड्डाणपुलाखाली बेघरांनी निवारा घेतल्याने अस्वच्छता पसरलेली आहे. या बेघरांचे याच ठिकाणी राहणे, खाणे-पिणे, कपडे-भांडी होत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. तसेच डासांचा प्रादुर्भावदेखील मोठ्या प्रमाणात वाढला असल्याने परिसरातील नागरिकांना विविध त्रासांना सामोरे जावे लागत आहे.
--------------------------------
अतिक्रमण विभाग हतबल
रात्रीच्या वेळेला तसेच दिवसाढवळ्या नशेत असलेल्या बेघरांमध्ये अनेकदा वादावादीतून मारामारीचे प्रकार घडत आहेत. त्यात महापालिकेने या ठिकाणी लोखंडाची जाळीदेखील लावली आहे. मात्र या जाळ्या तोडून आतमध्ये संसार थाटण्यात आला असल्याने नवी मुंबई महापालिकेचा अतिक्रमणविरोधी विभागदेखील कारवाई करून हतबल झाला आहे.
--------------------------------
घणसोली शिळफाटा उड्डाणपुलाखाली अनेक महिन्यांपासून बेघरांनी आश्रय घेतला आहे. पालिकेने या ठिकाणी जाळी बसवलेली आहे. पण त्याची तोडमोड केली गेली आहे. या प्रकारामुळे परिसराला बकाल स्वरूप आले असून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.
- संजय गायकवाड, नागरिक
--------------------------------
अनेक दिवसांपासून घणसोली उड्डाणपुलाखाली बेघरांच्या वास्तव्यामुळे महापालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षणाला बाधा निर्माण होत आहे. येथे महापालिकेने कुंपण लावूनदेखील बेघरांचा वावर आहे. त्यामुळे स्थानिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
- शीला माने, नागरिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan 24th Installment 2026 : पीएम किसान योजनेच्या 24 व्या हप्ताची प्रतीक्षा संपली! 30 ऑक्टोबरला जमा होणार 2000 रुपये? खात्यात पैसे येण्यापूर्वी लगेच करा 'हे' काम

KBC Marathi: तू चूक मान्य केलीस म्हटल्यावर... गौतमी पाटीलने माधुरी दीक्षित समोर दिली त्या गोष्टीची कबुली; अभिनेत्री म्हणाली-

IND vs NZ 2nd T20I Live: वैभव सूर्यवंशीचा वर्ल्ड रेकॉर्ड! न्यूझीलंडमध्ये मोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम, बांगलादेशी-पाकिस्तानी गार...

Latest Marathi News Live Update : ऑडिओ क्लिप आरोपावर मनोज जरांगे यांची रामदास कदमांवर टीका

Venus Transit Astrology : शुक्राचे 'चित्रा' नक्षत्रात आगमन; मेषसह 4 राशींच्या आयुष्यात होणार धनवर्षाव, करिअरमध्येही मोठी प्रगती

SCROLL FOR NEXT