मुंबई

कलेक्टर होण्यासाठी फक्त १०० रुपये लागतात...

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १४ : भारतीय नागरी सेवेत जाण्यासाठी आवश्यक असणारे आयएएसचे शुल्क फक्त १०० रुपये आहे. तेव्हा डॉक्टर बनण्यासाठी २ कोटी, तर इंजिनिअर बनायला ५० लाख लागतात. मात्र कलेक्टर व्हायला अवघे १०० रुपयेच लागतात, अशी माहिती देत मिशन आयएएसचे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी ‘स्पर्धा परीक्षांचे आव्हान’ सुलभ करून सांगितले. तसेच आपल्याकडे याबाबत पुरेशी जनजागृतीच होत नसल्याने पालकांना आणि मुलांना याची माहितीच नसल्याची खंतही व्यक्त केली.
ठाण्यात आयोजित ३७ व्या रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प बुधवारी सरस्वती शाळेच्या पटांगणात मिशन आयएएसचे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी गुंफले. यावेळी व्यासपीठावर या सत्राचे अध्यक्ष सुहास पाटील, ऋषिकेश दंडे आणि व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष आमदार संजय केळकर उपस्थित होते. श्रोत्यांमध्ये भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, माधुरी मेटांगे, माजी उपमहापौर सुभाष काळे, विद्याधर वैशंपायन, प्रा. कीर्ती आगाशे आदींसह नागपूर, सातारा येथील मान्यवर आवर्जून उपस्थित होते. डॉ. काठोळे यांनी उपस्थितांना केलेल्या मार्गदर्शनात, विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेविषयी असलेली भीती व न्यूनगंड घालवून सकारात्मकता जागृत निर्माण करण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी शेरोशायरी, तसेच संतवचने सांगून भारतीय नागरी सेवेंतर्गत आयएएस अर्थात भारतीय प्रशासकीय अधिकारी पदाची परीक्षा देण्यासाठी अभ्यासाच्या सोप्या पद्धती व त्यातील बारकावे समजावून सांगितले. आयएएसची परीक्षा देण्यासाठी ३५ टक्के गुण आवश्यक असून पूर्वपरीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी फक्त २५ टक्के गुण आवश्यक असतात. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर रोजचे काम रोजच करा. स्पर्धा परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी दररोज ३० प्रश्न सोडवणे गरजेचे असल्याचे प्रा. काठोळे यांनी सांगितले.

-------------------
वेळेचे योग्य नियोजन करा
विद्यार्थ्यांनी दररोजची वर्तमानपत्रे वाचून त्यातील माहिती फाईलमध्ये ‘एबीसीडी... अशी अल्फाबेटनुसार संकलित करावी. यामुळे विद्यार्थ्यांचे सामान्य ज्ञान अद्ययावत राहते. जी मुले ५ वी ते १२ वी पर्यंतचा अभ्यास काळजीपूर्वक करतात, ती आयएएस परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होतात. कारण त्यांचा पाया पक्का झालेला असतो. तेव्हा वेळेचे योग्य नियोजन करा. एक रुटीन तयार करा आणि त्याप्रमाणे तयारी करा. अनावश्यक कामांमध्ये वेळ वाया घालवू नका, असे प्रा. काठोळे यांनी श्रोत्यांना सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT