मुंबई

ज्येष्ठांची तुंगारेश्वर पर्वताची परिक्रमा

CD

नालासोपारा, ता. १४ (बातमीदार) : वसईचे तुंगारेश्वर हे घनदाट अभयारण्य आहे. या तुंगारेश्वर जंगलात महादेवाचे मंदिर असून, लाखो भाविक दर्शनासाठी जात असतात. याच तुंगारेश्वर जंगलात वसईतील तीन ज्येष्ठ नागरिकांनी दोन दिवस परिक्रमा करून ७० किलोमीटरचे अंतर पार करून, आजच्या तरुणाईपुढे एक नवा आदर्श घालून दिला आहे.
विठ्ठल आवारी, विजय अभ्यंकर आणि शशिकांत केणी अशी या परिक्रमा पार केलेल्या तीन ज्येष्ठांची नावे असून हे तिघेही ६५ ते ७० वयोगटातील आहेत. या तिघांनाही गिर्यारोहणाची अत्यंत आवड आहे. ही आवड जोपासणारे हे तिघे आहेत. या परिक्रमेदरम्यान सुंदर निखळ निसर्ग, भारद्वाज पक्ष्यांसह अनेक जातीच्या विविध पक्ष्यांचे दर्शन त्यांना घडल्याचे ते सांगत आहेत.
आजच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनात प्रत्येकाचे आयुष्य हे सीमित झाले आहे. स्वतःसाठी वेळच शिल्लक नसल्याचा कांगावा अनेक जण करीत असतात. त्यातूनच अनेक आजारांना निमंत्रण मिळत आहे, पण प्रत्येकाने आपले आयुष्य सुंदर आणि निरोगी जगण्यासाठी स्वतःसाठी वेळ काढून निश्चित निसर्गाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहनही या तीन ज्येष्ठ नागरिकांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Birth Death Registration Rules : जन्म-मृत्यू नोंदीला दोन वर्षे विलंब, तर न्यायालयाचे दार ठोठावे लागणार; केंद्राचे नवे कडक नियम लागू, गैरप्रकार रोखण्यासाठी पाऊल

सायनमध्ये डॉक्टरचा हायव्होल्टेज ड्रामा! नोकरीवरून काढल्याच्या रागात थेट टॉवरवर चढला अन्...; अंगावर काटा आणणारा Video Viral

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

Kunbi Certificate Update : मनोज जरांगेंच्या उपोषणाआधी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मराठवाड्यात 74 हजार कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप; हैदराबाद गॅझेटिअरनुसार किती अर्ज मंजूर?

SCROLL FOR NEXT