मुंबई

मुलाच्या वाढदिवशीच पित्याचा मृत्यू

CD

नवी मुंबई, ता. १४ (वार्ताहर) : दिघा एमआयडीसीतील यादव नगरमध्ये राहणाऱ्या एका रिक्षाचालकाचा त्याच्या मुलाच्या वाढदिवशीच मृत्यू झाल्याची घटना एमआयडीसी रस्त्यावर घडली. त्याचे भरधाव रिक्षावरील नियंत्रण सुटल्याने सदरची रिक्षा रस्ता दुभाजकावर धडकून त्याचा मृत्यू झाला होता. या अपघाताला तो जबाबदार असल्याचे आढळून आल्याने रबाळे एमआयडीसी पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

विकास पन्नालाल सरोज (वय ३४) दिघा एमआयडीसीतील यादव नगर परिसरात पत्नी व दोन मुलांसह राहत होता. विकासच्या मुलाचा मंगळवारी (ता. १०) वाढदिवस असल्याने तो रात्री मुलाच्या वाढदिवसाचा केक कापल्यानंतर मित्राला रिक्षाने सोडण्यासाठी गेला होता. त्याला सोडून तो एमआयडीसी रस्त्याने घरी परतताना भरधाव वेगात असलेल्या रिक्षावरील त्याचे नियंत्रण सुटले. त्यामुळे त्याची रिक्षा रस्ता दुभाजकावर धडकल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्यामुळे त्याला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याने बेदरकारपणे वाहन चालवून दुभाजकाला धडकून अपघात झाल्याचे पोलिस तपासात आढळून आल्याने बुधवारी (ता. ११) गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WPL 2027 Retaintion Full List: गुजरातने तब्बल १५ खेळाडूंवर दाखवला विश्वास, तर RCB-MI संघात कर्णधारांसह प्रमुख खेळाडू रिटेन

पाकिस्तानी सैन्याच्या अत्याचाराविरोधात बलूच मुलीची थेट भारताला साद; व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

Dapoli Tourism: सलग सुट्ट्यांचा फायदा; दापोली किनारपट्टीवर पर्यटकांची तुफान गर्दी, हर्णै मासळी बाजारातही उत्साह

Khamgaon Krushi Bazar Samiti: खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीस ११ लाखांचा हातभार

NEET 2027: पुढच्या वर्षीच्या नीट परीक्षेत होणार 'हे' बदल! वर्षातून अनेकवेळा परीक्षा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT