मुंबई

पालिकेच्‍या संथ सर्व्हरचा मनस्ताप

CD

धारावी, ता. १५ (बातमीदार) : विविध प्रकारचा कर भरणा, देयके अधिक जलद ऑनलाईन भरली जावीत, यासाठी पालिकेतर्फे नागरी सुविधा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत; मात्र अनेक ठिकाणी सर्व्हर संथ गतीने चालत असल्‍याने नागरिकांसह कर्मचारीवर्गालाही मनस्‍ताप सहन करावा लागत असल्‍याचे समोर आले आहे. दादर येथील ग/उत्तर प्रभाग कार्यालयात सर्व्हर अनेकदा बंद अथवा संथ चालत असल्‍याने नागरिकांना अर्धा–अर्धा तास रांगेत उभे रहावे लागत असल्‍याने नागरिकांनी या ऑनलाईन प्रणालीबाबत संताप व्‍यक्‍त केला आहे.
पालिकेतून जन्म, मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र, पाणी देयक, कर भरणा आदीचे पैसे अदा करण्यासाठी नागरिकांना प्रभाग कार्यालयातील विविध विभागांत धावपळ करावी लागत होती. त्यातून नागरिकांची सुटका व्हावी, यासाठी पालिकेतर्फे प्रभाग कार्यालयात एकाच छताखाली सर्व सुविधा मिळाव्यात, नागरिकांची धावपळ कमी करण्यासाठी ‘नागरी सुविधा केंद्र’ सुरू करण्यात आले आहेत.
पालिकेच्या दादर पश्चिम येथील ग/उत्तर प्रभाग कार्यालयात असलेल्या नागरी सुविधा केंद्रातील सर्व्हर अनेकदा बंद असतो अथवा संथ चालतो. यामुळे केंद्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. दोन मिनिटांच्या कामासाठी नागरिकांना किमान अर्धा तास रांगेत उभे राहून वाट पहावी लागत आहे. कामास वेळ लागत असल्याने केंद्रातील कर्मचारी व नागरिकांमध्ये वादही होत आहेत. यावर पालिका प्रशासनाने तोडगा काढण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

मनात असूनही तांत्रिक अडचणींमुळे अनेकदा सेवा देण्यास विलंब होतो. ज्या वेळी तांत्रिक अडचणी नसतात, त्या वेळी नागरिकांचे काम जलद गतीने केले जाते.
- प्रशांत पाटणे, नागरिक सुविधा केंद्रप्रमुख, ग/ उत्तर प्रभाग कार्यालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC rebels join BJP: 'तृणमूल'चे १७ बंडखोर खासदार भाजपच्या वाटेवर? NCPI नेत्याचं धक्कादायक विधान

Marathi News Live Updates : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लालबागच्या राज्याच्या दर्शनाला

रेल्वेत कुटुंबियांसोबत बसण्यासाठी सीट बदलता येते का? जाणून घ्या रेल्वेचा नियम...

LONG LIFE HOROSCOPE: या’ 6 राशींच्या लोकांना मिळतं दीर्घायुष्याचं वरदान? 100 वर्षांनंतरही राहतात निरोगी, ज्योतिषशास्त्रात काय आहे कारण?

Wani News : मार्कंडेय पर्वतावर पुन्हा ‘बंदी’चा डोंगर! चार वर्षांत धोकादायक शिड्या-पायवाटांची दुरुस्ती नाही, भाविकांचा संताप

SCROLL FOR NEXT