मुंबई

कोलाड परिसरात एकाच रात्री पाच घरे फोडली

CD

रोहा, ता. १६ (बातमीदार) : कोलाड वरसगाव परिसरातील भीरा फाट्याजवळ असणाऱ्या हंस-प्रीत रेसिडेन्सीमधील पाच सदनिका फोडून घरातील रोख रकमेसह सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे. या भागात एकाच रात्री पाच घरफोडीच्या घटना घडल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कोलाड वरसगाव परिसरातील संतोष संजय सानप, मंगेश मनोहर राजीवडे व अन्य तीन बंद घराच्या दरवाजांच्या कडी-कोयंडा व कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. कपाटात ठेवलेले १ लाख ७६ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली. या घटनेची माहिती समजताच कोलाड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर श्‍वान पथकाला पाचारण करण्यात आले. याबाबत कोलाड पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात चोरी व घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अजित साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Victory: अमित शाह बोलले! राहुल गांधींना दिलं प्रत्युत्तर; म्हणाले, 2029च्या निवडणुकांमध्ये...

IPL 2027 पूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय; युवराज सिंगकडे प्रशिक्षकपदाची जबाबदारी

यवतमाळमध्ये एसटी बस अन् दुचाकीचा भीषण अपघात, दोन सख्ख्या भावांसह तिघांचा मृत्यू

Water Supply : टंचाईग्रस्त गावांत पाण्याची गुणवत्ता तपासणार; १८ हजार ६५० नागरिकांना पिण्यासाठी टँकरद्वारे पाणी

Aadhaar Server Down : आधार सर्व्हर ठप्प, नवीन परिपत्रकाचा पेच; दुय्यम निबंधक कार्यालयांत दस्त नोंदणीचा खोळंबा!

SCROLL FOR NEXT