मुंबई

आयुक्त इक्बालसिंह चहल यांची ईडीकडून चार तास चौकशी

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : कोरोना काळात मुंबई महापालिकेत झालेल्या कथित भ्रष्टाचारप्रकरणी ईडीने मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची सोमवारी सुमारे चार तास चौकशी केली. चहल सकाळी ११ वाजता चौकशीसाठी ईडी कार्यालयात पोहोचले. चार तासांच्या चौकशीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आपण ईडीला पूर्णपणे सहकार्य करू, असे चहल यांनी माध्यमांना सांगितले.
कथित कोविड घोटाळ्याप्रकरणी चहल यांना समन्स पाठवण्यात आले होते. कोरोनाच्या काळात कोरोना सेंटरमध्ये वैद्यकीय उपकरणांच्या खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. कोरोना काळात मुंबईत जम्बो कोविड सेंटर सुरू करण्यासाठी विविध कंपन्यांना काँट्रॅक्ट देण्यात आले. त्यामध्ये लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस यांना कोणत्याही प्रकारचा अनुभव नसताना वैद्यकीय सेवा आणि उपकरणे पुरवण्याचे कंत्राट प्राप्त झाले. शिवाय कंत्राट प्राप्त करून घेण्यासाठी या कंपनीने बनावट कागदपत्रे पालिकेकडे सादर केल्याचा आरोप आहे. बेनामी कंपन्यांना कोविड सेंटरचे कंत्राट देऊन कोटींचा घोटाळा केल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. यासंदर्भात ईडीने मुंबई महापालिका आयुक्तांना सोमवारी कागदपत्रांसह चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. त्यानुसार इक्बाल सिंह चहल आज चौकशीसाठी हजर झाले.
...
कोविड सेंटर उभारण्यात पालिकेला शून्य रुपये खर्च!
माध्यमांशी बोलताना इक्बालसिंह चहल म्हणाले, ‘मार्च २०२० मध्ये भारतात कोरोनाचा शिरकाव झाला, तेव्हा कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्य सरकारने मोकळ्या मैदानात जम्बो कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला. त्या वेळेस पालिकेने राज्य सरकारला निवेदन दिले, की महापालिका कोरोना प्रबंधनात फार व्यग्र आहे. त्यामुळे कोविड रुग्णालयाचे बांधकाम करू शकत नाही. त्यानंतर मुंबईत ठिकठिकाणी उभारण्यात आलेले कोविड सेंटर बिगरसरकारी संस्थांनी बांधले. त्यामुळे हे कोविड सेंटर उभारण्यात पालिकेला शून्य रुपये खर्च आला. मुंबईत असे एकूण दहा जम्बो कोविड सेंटर बांधण्यात आले. यातील एका जम्बो कोविड सेंटरबाबात मुंबई पोलिसांकडे एक तक्रार दाखल झाली. त्याचविषयी चौकशी करण्यासाठी बोलावण्यात आले होते.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : मुंबईत सीजेपीच्या आंदोलनावर पोलिसांची धरपकड

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT