मुंबई

ज्वेलर्स दुकानातील चोरीप्रकरणी आरोपीस अटक

CD

अंधेरी, ता. १७ (बातमीदार) ः बोरिवलीतील महाराणा ज्वेलर्समध्ये झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यातील एका आरोपीस गुन्हे शाखेच्या दहिसर युनिटच्या अधिकाऱ्यां‍नी रविवारी (ता. १५) अटक केली. शाहिद ऊर्फ शाहिद रजाऊल शेख ऊर्फ बंगाली असे या आरोपीचे नाव असून त्याचा दुसरा सहकारी फरार आहे. त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. या दोघांनी ज्वेलर्स दुकानातून सुमारे ४० लाख रुपयांचे चांदीचे दागिने पळवल्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक विलास भोसले यांनी सांगितले. अटकेनंतर शाहिदला किल्ला कोर्टाने २१ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
सुनील शांताराम जैन हे ज्वेलर्स व्यापारी असून त्यांचे बोरिवली परिसरात महाराणा ज्वेलर्स नावाचे एक दुकान आहे. जुलै महिन्यात या दुकानातील शटरचे लॉक तोडून दोन अज्ञात तरुणांनी आत प्रवेश केला होता. त्यानंतर दुकानातील सुमारे ४० लाख रुपयांचे चांदीचे दागिने आणि कॅश घेऊन पलायन केले होते. दुसऱ्या‍ दिवशी हा प्रकार उघडकीस येताच सुनील जैन यांनी कस्तुरबा मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी घरफोडीचा गुन्हा नोंद होताच स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तपासाला सुरुवात केली होती. तपासादरम्यान या गुन्ह्यात शाहिदसह त्याच्या एका सहकाऱ्याचा सहभाग उघडकीस आला होता. ते दोघेही घरफोडीनंतर कोलकाता येथे पळून गेले होते. त्यामुळे त्यांच्या अटकेसाठी प्रभारी पोलिस निरीक्षक विलास भोसले यांच्या पथकातील प्रकाश सावंत, बागवे, गोमे, अल्ताफ खान यांना कोलकाता येथे पाठवण्यात आले होते. या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने गेल्या सहा महिन्यांपासून फरार असलेल्या शाहिदला हुबळी येथून शिताफीने अटक केली. चौकशीत त्याचा या गुन्ह्यात सहभाग उघडकीस आला होता. त्यानंतर त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. याच गुन्ह्यात तो सध्या पोलिस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IIT Bombay Student Tragedy : चॅटजीपीटीवरून कॉपी करताना पकडला, पवई आयआयटीच्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन

Ajit Agarkar : "मलाच या पदावर आता राहायचे नाही, तुम्ही नवीन अध्यक्ष शोधा..."; अजित आगरकरचं पत्र, BCCI कडूनही उत्तर; फुल ड्रामा

Latest Marathi News Update : अखेर भुलेश्वर राजाची मुर्ती पुन्हा विराजमान, कार्यकर्त्यांच्या डोळ्यात पाणी

श्रीदेवींच्या निधनानंतर त्यांची २५० कोटींची संपत्ती कुणाला मिळाली? मृत्यूनंतरही वर्षाला मिळणारे १३ कोटी कुणाच्या खात्यात जातात?

Monsoon Returns in Marathwada : मराठवाड्यात चार दिवस परतीचा पाऊस रविवारपासून हजेरी, ज्येष्ठ हवामान तज्ज्ञांकडून अंदाज व्यक्त

SCROLL FOR NEXT