मुंबई

चार दिवसांत ३८९ पक्ष्‍यांना जीवदान

CD

कांदिवली, ता. १७ (बातमीदार) ः कांदिवली पश्चिम येथील शंकर मंदिर मार्गावर असलेल्‍या सेव्ह बर्डस्‌ सेवा केंद्राने मकर संक्रांतीच्या तीनचार दिवसांत पतंगाच्या मांजामुळे जखमी झालेल्या ३७९ पक्ष्‍यांना जीवदान दिले आहे. त्‍यांच्‍या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सेव्‍ह बर्डस्‌ या सेवा केंद्रात जवळपास ७० ते ८० स्वयंसेवक महाविद्यालयीन विद्यार्थी, पक्षीमित्र जखमी पक्ष्‍यांना बास्केट किंवा कागदी बॉक्समधून सेवा केंद्रात घेऊन येतात. सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत येथे जखमी पक्ष्‍यांवर उपलब्ध डॉक्टर तातडीने उपचार करतात. डॉक्टरांनी सांगितले, की पतंगाचा मांजा पंखात आणि पायात अडकून जास्त पक्षी जखमी होतात. अशा पक्ष्‍यांवर योग्य औषधोपचार करून टाके मारले जातात. २४ तास खाण्यापिण्याची व्यवस्था करून निरीक्षण केले जाते. बरे झालेले पक्षी पुन्हा निसर्गात मुक्त केले जातात.

चार दिवसांत जीवदान मिळालेले पक्षी
३५० कबूतर
७ बगळे
२ घुबड
२ घार
१८ कावळे
१० इतर पक्षी

१५ वर्षांपासून कार्य
गेली १५ वर्षे सेव्ह बर्डस्‌ संक्रांतीच्या दिवसांत जखमी पक्ष्‍यांवर उपचार करून त्यांना जीवदान देत आहेत. सेव्ह बर्डस्‌ संस्थेचा मदतकार्य फोन नंबर संस्था मंडळे, समाजसेवकांकडे असल्याने, तातडीने माहिती मिळाल्याने पक्ष्‍यांचे जीव वाचवण्यात यश मिळते, असे संस्थेने सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: श्वानांचा ९३ नागरिकांना चावा, विधानसभेत मुद्दा गाजला; भटक्या कुत्र्यांसाठी महायुती सरकारचा मोठा निर्णय

Sports Teacher Recruitment : क्रीडा शिक्षक भरती रखडल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात; आझाद मैदानात ८ जुलैपासून बेमुदत धरणे आंदोलन

Higher Education Protest: एम.फिल पात्र कंत्राटी प्राध्यापकांना पदोन्नतीसाठी ‘स्पुक्टो’चे उच्च शिक्षण संचालक कार्यालयासमोर मंगळवारपासून बेमुदत धरणे

Solapur Health Crisis: मंगळवेढ्यात २७हून अधिक आरोग्य पदे रिक्त; भैरवनाथ उद्योग समूहाचे अनिल सावंत यांची आरोग्यमंत्र्याकडे तात्काळ भरतीची मागणी

Highway Crime : गोलटगाव फाट्यावर भरधाव वाहनासमोर उडी; २२ वर्षीय तरुणाने जीवन संपविले.

SCROLL FOR NEXT