मुंबई

खडीं ते शिर्डी पदयात्रेला उत्साहात सुरुवात

CD

खर्डी, ता. १९ (बातमीदार) : खर्डीतील साई श्रद्धा मित्र मंडळाच्या वतीने साईभक्तांच्या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. खर्डीत शांतता राहण्यासाठी व सर्व जाती-धर्माच्या लोकांमध्ये एकोपा राहावा, यासाठी खर्डी ते शिर्डी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याचे अध्यक्ष महेश निकम व ताराचंद मराडे यांनी सांगितले. या वेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुका विस्तारक गणेश राऊत, माजी जि. प. सदस्य विठ्ठल भगत, उपतालुकाप्रमुख किशोर शेलवले, अनिल मडके, प्रशांत खर्डीकर राष्ट्रवादीचे युवा उपजिल्हाध्यक्ष श्रेयस वेखंडे, दिनेश सदगीर यांच्यासह महिलांनी पदयात्रेत पालखी घेऊन साईभक्तांना शुभेच्छा दिल्या. पदयात्रेच्या दिवशी संपूर्ण खर्डी गाव परिसरात पालखीची मिरवणूक काढण्यात आली. या वेळी जिल्‍हा परिषद चालक-मालक संघटनेतर्फे साई भक्तांना अल्पोपाहार देण्यात आला. या पदयात्रेत परिसरातील २४० साई भक्तांनी सहभाग घेतला. खर्डी येथील साई मंदिरात २३ जानेवारीला साईबाबांच्या नवीन मूर्तीची स्थापना करण्यात येणार असून, २६ रोजी साई मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन साईश्रद्धा मंडळाचे उपाध्यक्ष अनिल पातकर व अशोक जाधव यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shetkari Karj Mafi : ३० जूनची मुदत उलटली; शेतकरी कर्जमाफीला पुन्हा विलंब, नवीन डेडलाईन काय?

Latest Marathi News Live Update : 'बीएलओ' आजपासून आपल्या दारी; रत्नागिरी जिल्ह्यातील १३ लाख मतदारांची पडताळणी

Patan Rain : कोयना पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाचे पुनरागमन; ९.२१ टीएमसी पाणीसाठा

Maharashtra Rain Alert : राज्यात पुढील ५ दिवस जोरदार पाऊस; 'या' भागांत रेड अलर्ट जारी, तुमच्या जिल्ह्यांत कसे असेल हवामान? जाणून घ्या

ढिंग टांग : जोनाथनचा सल्ला..!

SCROLL FOR NEXT