मुंबई

ठाणे ग्रामीण काँग्रेस महिला अध्यक्षपदी जान्हवी देशमुख यांची नियुक्ती

CD

खर्डी, ता. २१ (बातमीदार) : ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस महिला आघाडीला अखेर अध्यक्षा मिळाल्या असून, महिला उद्योजक म्हणून प्रसिद्ध असलेल्या शहापूरमधील जान्हवी देशमुख यांची प्रदेश अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांनी जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. जान्हवी देशमुख या माजी आमदार पा. शि. देशमुख यांच्या नातसून तर शहापूर तालुका एज्युकेशन सोसायटीचे जयवंत देशमुख यांच्या स्‍नुषा आहेत. त्या महिला उद्योजक म्हणून प्रसिद्ध असून स्वकंपनीच्या माध्यमातून त्यांनी शेकडो शेतकरी व महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. मागील वर्षी त्यांनी शहापूर नगरपंचायत निवडणूक लढवून राजकारणात सक्रिय प्रवेश केला. ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांनी जान्हवी देशमुख यांच्या नावाची शिफारस केली होती. त्यानुसार महिला प्रदेश अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांनी जान्हवी देशमुख यांची प्रभारी जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. जान्हवी देशमुख यांच्यावर जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून काँग्रेस शहापूर तालुका अध्यक्ष महेश धानके, प्रांतिक सदस्य रवींद्र परटोले, युवक अध्यक्ष अंकुश भोईर, शहर अध्यक्ष संजय तांबोळी, वासिंद महिला अध्यक्षा ज्योती परदेशी, युवा कार्यकर्ते गणेश व्यापारी यांनी जान्हवी देशमुख यांचा शाल, श्रीफळ व तुकाराम गाथा देऊन सन्मान केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Statement Gokul Election : हसन मुश्रीफ, विनय कोरे यांचे नाव घेऊन सतेज पाटलांची गोकुळ अध्यक्षपदावरून विनंती; म्हणाले राजकारण नको बहुमताचा विचार करा

Nanded Farmer Death: ‘माय मला लय मारायलेत, तरास सोसंना, पैशे टाक...’

Mumbai Accident: चांदिवलीत अपघाताचा थरार! मद्यधुंद महिलेनं चौघांना उडवलं, भरधाव वेगात कार नेत २ दुचाकींना धडक दिली अन्...

Latest Marathi News Update : अमरावती जिल्हा बँक निवडणुकीच्या हालचालींना वेग, ३१ ऑक्टोबरपूर्वी कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता

'अमेरिकेत तिला कोणीही ओळखत नव्हतं' माधुरीबद्दल बोलताना डॉ. नेने म्हणाले... 'तिच्यामुळेच तुम्ही सगळे माझी मुलाखत घेतात'

SCROLL FOR NEXT