मुंबई

कर्जत चित्रकला स्‍पर्धा

CD

रंगात रंगले सारे...

कर्जतमध्ये बच्चे कंपनीचा उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद
कर्जत, ता. २२ (बातमीदार)ः कर्जत शहरातील अभिनव ज्ञान प्रबोधिनी एज्युकेशन ट्रस्टच्या शारदा इंग्लिश मीडियम शाळेत ‘सकाळ’ तर्फे आयोजित चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांनी उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद दिला. हुडहुडी भरणारी थंडी असूनही विद्यार्थ्यांनी उत्‍साह वाखाणण्याजोगा होता. कोणी रंगीत खडू तर कोणी वॉटर कलरचा वापर करून चित्र साकारत होते.
प्रतीक अशोक पालवे या विद्यार्थ्यांने कोरोना योद्धा या विषयावर सुंदर चित्र काढले. तर विशाखा जगताप या पालक महिलेने सुद्धा विज्ञान या विषयावर छानसे चित्र काढले. शाळेच्या मुख्याध्यापिका अंजली किसवे तसेच शिक्षिका अस्मिता ठाणगे, चेतना महांगडे, श्रुतिका पवार, सोनाली गवळे, रशिदा कर्जतवाला यांनी पर्यवेक्षिका म्हणून काम पाहिले.
कर्जत ः प्रतीक पालवे याने कोरोना योद्धा या विषयावर चित्र रेखाटले.

..............

माणगावमधील केंद्रावर जोशपूर्ण वातावरण

माणगाव, ता. २२ (बातमीदार) ः शहरातील अशोक दादा साबळे विद्यालय केंद्रात प्रचंड उत्साह आणि जोशपूर्ण वातावरणात सकाळ माध्यम समूहातर्फे आयोजित चित्रकला स्‍पर्धा पार पडली. गेल्‍या काही दिवसांपासून उत्‍सुकता लागलेल्‍या या स्पर्धेत माणगाव शहर व तालुक्यातील विविध माध्यमांच्या विद्यार्थ्यांसह नागरिक, ज्‍येष्‍ठांनी सहभाग नोंदवला.
अत्‍यंत एकाग्रतेने रंग, रेषा व कल्पकतेने स्पर्धकांनी चित्रे रेखाटली. सकाळपासूनच तालुक्‍यातील विविध गावातील पालक-विद्यार्थ्यांनी स्‍पर्धा केंद्रावर गर्दी केली होती. यावेळी विद्यार्थ्यांचा उत्‍साह शिगेला होता.
सकाळ वृत्तपत्राची ही चित्रकला स्पर्धा म्‍हणजे विद्यार्थी व पालकांसाठी पर्वणी असून कलेचे वेगळे व्यासपीठ मिळत असल्याची भावना या वेळी अनेक पालकांनी बोलून दाखविली.
स्पर्धा यशस्वी होण्यासाठी माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. राजीव साबळे यांचे विशेष सहकार्य मिळाले. तसेच विद्यालयाचे प्राचार्य डी. एम.जाधव, अरुण पवार, कलाशिक्षक आर. टी. पवार, संजय आरसे, भरत काळे, राजेंद्र भगत, सचिन वनारसे, अनंत सावंत यांनी सहकार्य केले.
अत्‍यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्‍या स्पर्धेच्या निकालाची उत्सुकता सर्वांना लागून आहे. दरवर्षी अशा स्पर्धा व्हाव्यात, अशी विनंती करून अनेक पालकांनी ‘सकाळ’ वृत्तपत्राच्या या शैक्षणिक उपक्रमाबद्दल अभिनंदन केले.

सकाळ चित्रकला स्पर्धेची आम्ही वाट पाहतो, अत्‍यंत वेगळे विषय व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारी ही स्पर्धा आहे. अशा पद्धतीचे शैक्षणिक उपक्रम राबविल्याबद्दल ‘सकाळ’चे आभार.
- मनीष पाटील, पालक

सकाळ समूहाची चित्रकला स्पर्धा आमच्या विद्यालयात आयोजित होणे अतिशय आनंदाची बाब आहे. या उपक्रमात आम्हीही सहभागी झालो, याचा आनंद आहे. स्पर्धक विद्यार्थ्यांनी अतिशय उत्‍साहात, सुंदर चित्र रेखाटली आहेत.
- डी.एम. जाधव, मुख्याध्यापक, अशोक दादा साबळे विद्यालय, माणगाव.

स्पर्धेतील चित्र काढायला मला आवडले, सर्वच विषयांवर मला चित्र काढायची होती. मी घरी ती काढेल. मला स्पर्धेत सहभागी होऊन खूप आनंद मिळाला.
- सृष्टी राजेंद्र भगत, विद्यार्थिनी, माणगाव

माणगाव ः केंद्रातील विद्यार्थ्यांमध्ये उत्‍साह दिसून आला.

---------------------

रसायनीतील स्‍पर्धेत ४९४ जणांचा सहभाग
रसायनी, ता. २२ (बातमीदार) : वासांबे-मोहोपाडा येथील महात्मा एज्युकेशन सोसायटी संचालित पिल्लई एचओसीएल महाविद्यालयात सकाळ वृत्तपत्राच्या वतीने चार वेगवेगळ्या गटातील चित्रकला स्‍पर्धा घेण्यात आली.
‘अ’ गटात पहिला ते दुसरी-१२५, ‘ब’ गटात तिसरी ते चौथी-११०, ‘क’ गटात पाचवी ते सातवी-१६६, ‘ड’ गटात आठवी ते दहावी- ८५ आणि ‘ई’ गटात महाविद्यालयीन- ८ असे विद्यार्थी स्पर्धेत सहभागी झाले होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पिल्लई एचओसीएलचे अमित राजे, संजय कन्हरे, प्रिया स्कूलचे दिपाली शिर्के, विपषाना भालेराव, सांची भालेराव, आर्या पाटील, आदर्श जाधव, प्रिन्स मंडल यांनी सहकार्य केले. तसेच माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका रिमा निकाळजे, आर. बी. पाटील यांनी स्पर्धासाठी विशेष सहकार्य केले.

रसायनी -

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT