पेण, ता. २३ (वार्ताहर) : माघी गणेशोत्सव येत्या २५ जानेवारी रोजी साजरा होत असल्याने पेणमध्ये सगळीकडे गणेशोत्सवाचे वेध लागले आहे. त्यामुळे पेणच्या गणेशमूर्ती कार्यशाळांमध्ये मूर्ती बनवण्याची लगबग सुरू आहे. मात्र हा माघी गणेशोत्सव साधारणपणे रायगड जिल्ह्यासह मुंबईत खासगी ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.
पेण हे गणेशमूर्तींचे माहेरघर असल्याने येथे अनेक मूर्ती कार्यशाळा सुरू आहेत. या कार्यशाळांमध्ये असंख्य मूर्तिकार वेगवेगळ्या मूर्ती तयार करतात. पेण शहरासह हमरापूर, जोहे, अंतोरे, तांबडशेत, कळवे, वडखळ व इतर गावांतील विविध कार्यशाळांमध्ये गणेशमूर्तीच्या कामाला वेग आला आहे. हा माघी गणेशोत्सव सार्वजनिक मंडळासह खासगी मंडळे तसेच काही घरगुती ठिकाणी गणेशमूर्तीची स्थापना करतात.
माघ महिन्यातली विनायक, वरद, तीलकुंद चतुर्थीचा शुभयोग असून पूर्वापार गणेश मंदिरात थाट साजरा करतात तर अनेक गणेशभक्तांच्या हौसे मौजेखातर सार्वजनिक व खासगी अशा दोन्ही स्वरूपात माघी गणेशोत्सवाचे स्वरूप गेल्या काही वर्षांपासून दिसू लागले आहे. सध्या पेणच्या मूर्तिकारांच्या कार्यशाळांमध्ये रंगरंगोटीची लगबग सुरू आहे. एक फुटापासून साधारण सहा फूट उंचीच्या सार्वजनिक मंडळाच्या मोठ्या गणेशमूर्ती रंगविण्यासाठी कार्यशाळांमध्ये आणल्या जात आहेत. तर प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून बनविलेल्या गणेशमूर्ती अंतोरे, कळवे, जोहे, तांबडशेत, हमरापूर येथील कार्यशाळांमध्ये आणून साज चढवला जातो आहे.
पेण शहराचा लौकिक गणेशमूर्तींचे माहेरघर म्हणून आहे. येथील मूर्तींना सातासमुद्रापारही मोठी मागणी आहे. माघी गणेशोत्सवासाठी मुंबई, पुणे येथून गणेशमूर्तींना मोठी मागणी असल्याने कारखान्यांमध्ये कारागिरांची लगबग सुरू आहे.
- अजित लांगी, मूर्तिकार, पेण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.