मुंबई

जिल्ह्यातील विकासकामांसाठी वाढीव निधी द्या

CD

पालघर, ता. २५ (बातमीदार) : उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण आराखडा अंतिम करण्याबाबतची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीमध्ये पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी जिल्ह्यातील विकास कामांसाठी वाढीव निधी मिळावा यासाठी मागणी करण्यात आली.
या वेळी पालघर जिल्ह्याला भेडसावणाऱ्या प्रामुख्याने आरोग्य व कुपोषणाच्या प्रश्नाकडे अध्यक्षांनी लक्ष वेधले. यामध्ये जव्हार उपजिल्हा रुग्णालय येथे दोनशे खाटांच्या रुग्णालयाचा प्रश्न प्रलंबित असल्याबाबत व मोखाडा तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयाच्या ५० खाटांच्या रुग्णालयाचे काम प्रलंबित असल्याबाबत उपमुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. जिल्हा परिषद पालघरमधील जिल्हा परिषद शिक्षक ६० टक्क्यांपेक्षा कमी असल्यामुळे जिल्ह्यामध्ये शिक्षकांची भरती लवकरात लवकर करण्यात यावी याबाबत निवेदन या वेळी देण्यात आले.
या बैठकीसाठी पालघर जिल्ह्यातील खासदार, सर्व आमदार, विभागीय आयुक्त, पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व पालघर जिल्ह्यातील विविध विभागांचे विभागप्रमुख व अधिकारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT