मुंबई

असंसर्गजन्य आजारग्रस्त मुंबईकरांना हेरणार

CD

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २५ : मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरात असंसर्गजन्य आजाराच्या रुग्णांना शोधण्याची मोहीम हाती घेतली आहे. यासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे क्लिनिकमध्ये तपासणी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ३० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या १३ टक्के मुंबईकरांना उच्च रक्तदाबाचे निदान झाल्याचे समोर आल्याने असंसर्गजन्य आजारांच्या रुग्णांचा शोध घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यात ‘आपला दवाखाना’ महत्त्वाची भूमिका बजावणार असून, जे दवाखान्यापर्यंत आले नाहीत, अशा मुंबईकरांची घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येणार आहे.

आम्हाला मुंबईकरांना निरोगी ठेवायचे आहे. याच पार्श्वभूमीवर असंसर्गजन्य आजारांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. मुंबईकरांनी याला चांगला प्रतिसाद दिल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले. या तपासणी मोहिमेमुळे मुंबईतील असंसर्गजन्य आजाराच्या रुग्णांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल. तसेच असंसर्गजन्य आजाराच्या सुरुवातीच्या टप्प्यातील रुग्ण या मोहिमेतून त्वरित समोर येतील. यातून रक्तदाब तसेच मधुमेही रुग्णांची संख्याही समजू शकणार असल्याने घरोघरी तपासणी मोहीम सुरू करण्यात आल्याचे डॉ. कुमार यांनी सांगितले.

घरोघरी तपासणीतून सुटलेले मुंबईकर आपला दवाखान्यात येऊन तपासणी करतील. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्यांची संख्या १०० वर जाणार आहे. आतापर्यंत या दवाखान्यांचा दोन लाखांहून अधिक मुंबईकरांनी लाभ घेतला आहे, अशी माहिती पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.

हृदयविकार, हृदयविकाराचा झटका आणि मधुमेह या आजारांतून मुंबईत एकत्रितपणे दरवर्षी ४० टक्के मृत्यू होतात. गेल्या वर्षी महापालिकेने जागतिक आरोग्य संघटनेच्या मदतीने आजारांचे सर्वेक्षण केले होते. यातून १८ ते ६९ वयोगटातील सुमारे १८ टक्के मुंबईकरांमध्ये रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण वाढल्याचे, तसेच रक्तदाब तपासणीत ११ टक्के प्रमाण दिसून आले. त्यामुळे उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचे लवकर निदान झाल्यास तातडीने पावले उचलण्यास मदत होईल.
- डॉ. मंगला गोमारे, कार्यकारी आरोग्य अधिकारी, पालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Women's U19 T20 World Cup 2027 Schedule : भारत-पाकिस्तान वेगळ्या गटात... वर्ल्ड कपचे वेळापत्रक जाहीर; गतविजेत्यांसमोर तगडे स्पर्धक

Italy Protests : इटलीत Gen-z आंदोलकांवर गुन्हे दाखल होणार; आईवडिलांकडून वसूल केली जाणार नुकसान भरपाई, मेलोनी यांचा मोठा निर्णय !

Jio IPO: भारतातील सर्वात मोठ्या IPO चा विक्रम! अवघ्या काही तासांत पूर्ण सबस्क्राइब; GMP किती वाढला?

Latest Marathi News Live Update : टायगर श्रॉफवर झालेल्या हल्ल्यानंतर अक्षय कुमारनेही घेतला धसका

Rare Namaqua Dove Spotted in Uran : लांब टोकदार शेपटी अन् पिवळी चोच; आफ्रिकेतून हजारो किलोमीटर प्रवास करून उरणमध्ये पोहोचला हा पक्षी, गुजरातमध्ये झालेली पहिली नोंद

SCROLL FOR NEXT