मुंबई

मुलीवर अत्याचार करणारे दोघे अटक

CD

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २९ : पोलिस असल्याचे खोटे सांगत चौकशीच्या बहाण्याने मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली. विष्णू भांडेकर (वय २५) आणि आशीष गुप्ता (वय ३२) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.

डोंबिवली परिसरात राहणारे महाविद्यालयीन तरुण, तरुणी शुक्रवारी (ता. २८) दुपारी ठाकुर्ली रेल्वेस्थानकाजवळील खाडी किनाऱ्यालगत असलेल्या निर्जनस्थळी फिरण्यास गेले होते. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास त्या ठिकाणी विष्णू व आशीष त्या परिसरात आले. त्यांनी तरुण, तरुणीला ते पोलिस असल्याचे सांगितले. तसेच मोबाईलमध्ये काढलेले त्यांचे काही फोटो, व्हिडीओ व्हायरल करण्याची, तसेच घरच्यांना दाखवण्याची धमकी दिली. चौकशीच्या बहाण्याने मुलाला व मुलीला त्यांनी वेगळे केले. त्यातील एकाने मुलाला स्थानक परिसरात नेले व दुसऱ्याने त्या निर्जनस्थळी मुलीला धमकावत तिच्यावर अत्याचार केला होता. दुसऱ्यानेही अत्याचार केल्यानंतर दोघांनी त्या परिसरातून पळ काढला. मुलीला स्थानक परिसरात आरोपींनी सोडून दिल्यानंतर मुलीने तिच्या मित्रास घडलेला प्रसंग सांगितला. त्यानंतर स्टेशन परिसरात ती बराच वेळ बसून होती. काही नागरिकांच्या सांगण्यावरून ती आरपीएफ पोलिसांकडे गेली व घडलेली घटना सांगितली. विष्णूनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घटना घडली असल्याने शनिवारी (ता. २९) पहाटे विष्णूनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

जामिनावर सुटताच अत्याचार
तरुणीने केलेले वर्णन, तसेच त्या परिसरातील तांत्रिक बाबी लक्षात घेत पोलिसांनी विष्णू याला नेवाळी नाका व आशीष याला नांदिवली रोड परिसरातील त्याच्या घरातून अटक केली. यातील आरोपी विष्णू हा घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार असून दोन-तीन महिन्यांपूर्वीच त्याला चोरीच्या घटनेत अटक करण्यात आली होती. ठाकुर्ली परिसरातच त्याने ती चोरी केली होती. जामिनावर सुटका होताच त्याने मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे.

तरुणीला प्रभावित करण्याचा प्रयत्न
महाविद्यालयीन तरुण हा मैत्रिणीला प्रभावित (इम्प्रेस) करण्यासाठी मित्राची दुचाकी घेऊन आला होता. ठाकुर्ली पूर्वेला दुचाकी पार्क करून ते पश्चिमेला निर्जनस्थळी फिरण्यास गेले होते.

निर्जनस्थळी जाताना विचार करा
बावनचाळ परिसरात याआधीही एका मुलीवर अत्याचार घडल्याची घटना घडली होती. निर्जनस्थळी मुलींना नेऊन त्यांच्यावर अत्याचार होत असल्याने अशा निर्जनस्थळी जाताना मुलींनी विचार करा, सावध व्हा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: बिश्नोईने दूर केला तुफानी खेळ करणाऱ्या सुनील नारायणचा अडथळा, कोलकाताने गमावली दुसरी विकेट

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

SCROLL FOR NEXT