मुंबई

मुंबई-अबुधाबी विमानात मद्यधुंद महिलेचा गोंधळ

CD

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ३१ : मुंबई-अबुधाबी विमानात मद्याच्या नशेत महिलेने गोंधळ घालत क्रू मेंबरला मारहाण केल्याचा प्रकार रविवारी (ता. २९) रात्री घडला आहे. त्यानुसार सहार पोलिसांनी ४५ वर्षीय इटालियन महिलेला अटक केली आहे. पाओला पेरुशियो असे या महिलेच नाव असून, तिला २५ हजार दंड ठोठावून जामिनावर सोडण्यात आले. ही महिला मद्यधुंद अवस्थेत आपली सीट सोडून बिझनेस क्लासमधील सीटवर जाऊन बसली. क्रू मेम्बरने तिला रोखले असता तिने मारहाण केली. या वेळी दुसऱ्या क्रू मेंबरने रोखण्याचा प्रयत्न केला असता ही महिला तिच्या तोंडावर थुंकली आणि कपडे काढून विमानात फिरू लागली. कॅप्टनच्या निर्देशानुसार या महिला प्रवाशाला रोखून तिला कपडे घालण्यात आले. यानंतर विमान लँड होईपर्यंत तिला सीटला बांधून ठेवण्यात आले. पोलिसांनी महिलेला अटक केल्यानंतर तिचा पासपोर्टही जप्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajya Sabha Politics: राज्यसभा निवडणूक बिनविरोध शक्य, आजोबा - नातू एकाचवेळी राज्यसभेत; एकनाथ शिंदेंनी आपल्याच नेत्यांचा केला गेम

Latest Marathi News Live Update : राज्याचा अर्थसंकल्प आज विधीमंडळात; कोणत्या घोषणा होणार?

Kannad Accident : कन्नड-वैजापूर मार्गावर अपघात; जेहूरचा तरुण जागीच ठार

Whale Vomit Smuggling Case : पाच किलो वजन आणि किंमत कोटींच्या घरात! महाबळेश्वरमध्ये व्हेल माशाच्या उलटीची तस्करी; पुणे, मुंबईसह मालवणचे सात जण ताब्यात

Sakal News Impact : पुण्यातील अल्पसंख्याक शाळांवर टांगती तलवार; शिक्षण उपसंचालकांकडून चौकशीचे आदेश

SCROLL FOR NEXT