मुंबई

रस्त्याची कामे, रिक्षांचा वळसा प्रवाशांच्या खिशाला फटका

CD

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १ : रिक्षाचालकांच्या मनमानी भाडेवाढीमुळे प्रवासी त्रासले असताना आता रस्त्यांची सुरू असलेली कामे रिक्षा प्रवाशांचा खिसा कापत आहेत. शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांच्या सिमेंट काँक्रीटीकरणाची काम सुरू आहेत. या कामांमुळे वाहनचालकांना पर्यायी रस्त्याने फिरून जावे लागत आहे. रिक्षाचालकांनी याचा फायदा घेत रिक्षाभाडे दरात परस्पर वाढ केली आहे. पाच ते १० रुपयांची ही वाढ असून, आरटीओ प्रशासनाने याकडे पूर्णपणे डोळेझाक केली आहे. तक्रारी आल्या, की त्या परिसरात कारवाई करणे यापलीकडे आरटीओ काहीही काम करत नसल्याने प्रवाशांमध्ये आरटीओ प्रशासनाविरोधात प्रचंड नाराजी आहे.

कल्याण-डोंबिवली शहरात रिक्षांचे मोठ्या प्रमाणात जाळे पसरले आहे. परिवहन सेवा सक्षम नसल्याने रिक्षाचा आधार प्रवाशांना घ्यावा लागतो. शहरातील रिक्षा युनियनशी आरटीओचे लागेबांधे असल्याने परिवहन सेवा सक्षम होत नसल्याचे आरोप होत आहेत. कोरोना कालखंडानंतर रिक्षाचालकांनी मनमानी पद्धतीने पाच ते १० रुपयांची भाडेवाढ केली असून, आरटीओ अद्याप या मनमानीला चाप लावू शकलेले नाही. आधीच रिक्षा भाडेदरात वाढ झाली असताना आता शहरातील रस्त्यांची सुरू असलेली कामेदेखील रिक्षाचालकांच्या पथ्यावर पडली आहेत. रिक्षाचालकांना पर्यायी रस्त्यावरून वळसा घालून जावा लागत असल्याने चालकांनी भाडे परस्पर पाच ते १० रुपयांची वाढवले आहे. काही भागात रस्त्यांची कामे सुरू नसतानाही भाडे वाढल्याचे सांगत चालक प्रवाशांकडून जादा भाडे आकारत आहेत.
-------------------------------
...तर पुन्‍हा भाडे कमी करू
रस्त्याची कामे सुरू आहेत, पर्यायी रस्ते चांगले नसल्याने वाहनाचे नुकसान होते; तसेच इंधनदर वाढत असल्याने आम्ही जादा पैसे घेत आहोत. रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यावर परत भाडे कमी करू, असे रिक्षाचालक सांगतात.
-----------------------------------------------

भाडेवाढीने कंबरडे मोडले
मानपाडा रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. डोंबिवलीवरून मानपाडा पेट्रोल पंप येथे जाणाऱ्या प्रवाशांकडून ३० रुपये आकारत आहेत. काम सुरू होण्याच्या आधी येथे २५ रुपये आकारले जात होते.

पलावा येथे जाण्यासाठीदेखील रिक्षाचालक याच पर्यायी मार्गाचा वापर करतात; पण त्या भाड्यात वाढ करण्यात आलेली नाही.

डोंबिवलीमधील सर्वेश रोड परिसरात सावरकर रोडकडे जाणाऱ्या एका रस्त्याचे काम सुरू आहे. अनेक रिक्षाचालक यामुळे टिळक चौक रोडने सावरकर रोडकडे जातात. यासाठी पूर्वी २० रुपये आकारले जायचे आता ३० रुपये घेतले जातात.

आयरे गाव ते स्टेशन परिसरातील पी. पी. चेंबर यासाठी पूर्वी ३० रुपये प्रवाशांकडून आकारले जात होते. आता हे भाडे ४० ते ५० रुपये घेतले जात आहे. या भागात रस्त्याचे काम सुरू नसतानादेखील जादा भाडे आकारले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : धैर्यशील माने-सत्यजित पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री

Video: दत्ता भरणे यांच्याकडून गावकऱ्यांना शिवीगाळ? सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

Uber Fake Fare Scam : चालक दाखवतायत खोटं भाडं, ग्राहकांची होतेय लूट.. उबरने दिला सावधान राहण्याचा इशारा!

MI Playoffs Chances : बुडत्या मुंबईचं थालाच्या चेन्नईकडे लक्ष! MI फॅन्स निराश होऊ नका... अजूनही होता येईल क्वालिफाय?

Delhi Liquor Scam: मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत 15 मे पर्यंत वाढ

SCROLL FOR NEXT