मुंबई

गर्भवतीचा विनयभंग; पोलिसावर गुन्हा

CD

नवी मुंबई, ता. १ (वार्ताहर) : पतीसह मोटरसायकलवरून सोनोग्राफी करण्यासाठी जाणाऱ्या एका गर्भवतीसोबत पोलिस कॉन्स्टेबलने असभ्य वर्तन करून तिला व तिच्या पतीला धक्काबुक्की व शिवीगाळ केल्याचा व धमकावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दिनेश ईश्वर महाजन असे या पोलिस कॉन्स्टेबलचे नाव आहे. तो सध्या नवी मुंबई पोलिस मुख्यालयात कार्यरत असून आज खारघर पोलिसांनी त्याच्याविरोधात विनयभंग तसेच शिवीगाळ करून मारहाण करणे, धमकावणे आदी कलमांखाली गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.
या घटनेतील २६ वर्षीय विवाहिता सीबीडी बेलापूर येथील दिवाळे गावात पतीसह राहण्यास आहे. ती दोन महिन्यांची गर्भवती असून मंगळवारी (ता. ३१) सायंकाळी पतीसह मोटारसायकलवरून खारघर येथे सोनोग्राफी करण्यासाठी जात असताना हा प्रकार घडला. त्यांची मोटरसायकल बेलापूर मेट्रो स्टेशनजवळ आली असताना पोलिस कॉन्स्टेबल महाजन याने भरधाव वेगाने आपली कार त्यांच्या मोटरसायकलला घासून पुढे नेली. त्यामुळे पती-पत्नी पडतापडता वाचले. त्यामुळे विवाहितेच्या पतीने कार थांबवण्याचा प्रयत्न केला; मात्र महाजन याने त्यांच्या मोटरसाकलला धडक देण्याचा प्रयत्न केला. पती कारचालकाला विचारण्यासाठी पुढे गेला असताना महाजन याने कारमधून पोलिस नावाची पाटी काढून ती डॅशबोर्डवर ठेवली आणि पोलिस आहोत, असे सांगून शिवीगाळ करीत धमकावण्यास सुरुवात केली. या वेळी त्याने मारहाण करण्यास हात उचलला असता विवाहिता पुढे आल्याने त्याचा फटका तिला लागला. त्यानंतर त्याने हाताने विवाहितेला बाजूला ढकलले. धक्काबुक्की सुरू असताना त्या ठिकाणी आलेल्या पोलिसांनी महाजनला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिस दिनेश महाजनविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

Ankita Lokhande : "तिला स्टुडंट ऑफ द इयर 3ची ऑफर मिळालीच नव्हती"; अफवांवर अंकिताच्या टीमकडून स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Akshaya Tritiya 2024 : कधी आहे अक्षय्य तृतीया? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व

Lok Sabha Election: उन्हाचा कहर वाढला! निवडणूक आयोग सतर्क, बिहारनंतर या राज्यातही मतदानाची वेळ वाढवली

SCROLL FOR NEXT