मुंबई

एमडीच्या साठ्यासह एकाला अटक

CD

मानखुर्द, ता. ४ (बातमीदार) ः गोवंडीच्या संजय नगर पार्ट दोन परिसरातून शिवाजी नगर पोलिसांनी मेहताब शेख ऊर्फ नूर तोतला या तरुणाला शुक्रवारी (ता. ३) रात्री ताब्यात घेतले. त्याच्याकडून ९० हजार रुपये किमतीचा २० ग्रॅम एमडी या अमली पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला. त्‍यानंतर त्याच्याविरोधात अमली पदार्थ विरोधी कायद्यासह विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली. शिवाजी नगर पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक बाबू बेले व प्रशांत कांबळे यांचे पथक परिसरात गस्त घालत होते. त्या दरम्यान मेहताब संशयास्पदरित्या वावरताना आढळला. पोलिसांना पाहताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पाठलाग करून त्याला पथकाने पकडले व चौकशी केली. तसेच त्याची पंचांसमोर झडती घेण्यात आली. त्या झडतीत त्याच्याकडे अमली पदार्थांचा साठा असल्याचे आढळले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Leader Arrest : राज ठाकरेंच्या शिलेदाराला फसवणूक प्रकरणात अटक, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

Yuzvendra Chahal Retirement : युझवेंद्र चहलने अचानक घेतली निवृत्ती; पोस्टने खळबळ, म्हणाला, माझ्यात अजूनही क्रिकेट शिल्लक, पण...

Mumbai News: शौचालयातील विषारी वायूमुळे 2 तरुणांचा मृत्यू; गोरेगावातील 'त्या' कारखान्याला टाळे ठोकण्याचे आदेश

Latest Marathi News Live Update : कॅप्टन स्मित मच्छार यांचा 'अशोक चक्रा'साठी विचार करावा, मिलिंद देवरा यांची पंतप्रधान मोदींना विनंती

Captain Smit Machhar: ‘कॅप्टन स्मित, धन्यवाद!’; इस्रायलकडून मुंबईत होर्डिंग्जद्वारे भारतीय वैमानिकाला सलाम

SCROLL FOR NEXT