मुंबई

कांदिवलीकरांनी अनुभवली वानराची मज्जा

CD

कांदिवली, ता. ४ (बातमीदार) ः महावीर नगर परिसरात के. टी. सोनी मार्गावर एक वानर चक्क रस्त्यावर उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांवर बसले होते. वानर पाहून व्यावसायिक, स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी पाहण्यासाठी गर्दी केली. प्राणीप्रेमींनी तसेच फळे विक्रेत्यांनी वानराला केळी, पेर दिले; तर काहींनी चणे-शेंगदाणे टाकले. वानर मस्त आस्वाद घेत पसार झाले. ही गोष्‍ट गुरुवारी (ता. २) घडली.
के. टी. सोनी मार्गांवरील महावीर दर्शन इमारतीमधून बाहेर येताच टूनकर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारच्या टपावर उडी मारून वानर बसले. काळे तोंड, बारीक किलकिल्या डोळ्यांनी बघणारे आणि जवळपास चार फूट लांबलचक शेपटी हलवत वानर ये-जा करणाऱ्या गाड्या, प्रवासी न्हाहाळू लागले. बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि बघता बघता व्यावसायिक, स्थानिक आणि प्रवासी जमा झाले. ते सर्व वानराकडे कुतूहलाने पाहत होते. काही फोटो काढण्यात दंग झाले; तर काही वानराला केळी फळे आणि चणे शेंगदाणे देत होते. वानरदेखील आवडीने स्वीकारून फळांचा आस्वाद घेत होते. त्यातील काही प्रवाशांनी सांगितले की, गेले महिनाभर हा एकता नगर, आदर्श नगर, डहाणूकर वाडी आणि महावीर नगर परिसरात फिरत आहे.
राष्ट्रीय संजय गांधी उद्यानात कॉल केला असता, तुम्ही त्याला खायला देऊ नका. तो पुन्हा जंगलात येईल. त्याला फळांची तसेच इतर स्वाल्टी आणि चवदार पदार्थ मिळाल्याने तो तेथेच फिरत राहणार, असे आवाहन केले होते. मात्र नागरिक काहीना काही देत होते. अखेर पोट भरल्यानंतर टुणकन उडी मारून वानर रस्ता ओलांडून दिसेनासे झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Disha Salian Case: आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ! दिशा सालियन प्रकरणात ५०० कोटींची भरपाई अन् बिनशर्त माफीची मागणी

Chiplun Flyover Work : चिपळूणकरांसाठी महत्त्वाची बातमी! उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात, पण 'या' कारणामुळे गणेशोत्सवात काम थांबले!

Arnala Fort History: २२९ वर्षांपूर्वी अर्नाळा किल्ल्यावर कसा साजरा व्हायचा गणेशोत्सव? मोडी कागदपत्रांतून ऐतिहासिक रहस्य उलगडलं

Latest Marathi News Update : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या सरकार पाठीशी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

Ujani Water Crisis : उजनी परिसरातील वीज दोन तासांवर आणण्याच्या हालचाली ; सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता तीव्र

SCROLL FOR NEXT