मुंबई

बस स्थानकातील वेडिंग मशीन गायब

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : पॅडमेन चित्रपटात प्रमुख भूमिका निभावणाऱ्या अभिनेता अक्षय कुमारने एसटी महामंडळाच्या मुंबई सेंट्रल बस स्थानकावर सॅनिटरी वेंडिंग मशीनचे उद्घाटन केले होते. तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मुंबई विभागातील महिला स्वच्छतागृहात या मशीन लावल्या होत्या. महिलांच्या मासिक पाळीत त्यांना त्यांच्या सोयीनुसार सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देत महिलांची कुचंबणा थांबवण्याचा प्रयत्न त्यावेळी करण्यात आला होता. मात्र, आता या मशीन मुंबई विभागातील डेपोतून गायब झाल्या आहेत.

एसटी महामंडळाच्या प्रवासामध्ये महिला प्रवाशांची सर्वाधिक संख्या आहे. त्यामुळे अत्यंत अल्प दरात सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सरकारतर्फे २०१८ मध्ये करण्यात आला होता. या मशीनध्ये १० रुपयांचा कॉइन टाकल्यास पॅड मिळत असे. मात्र, या मशीन शौचालयातून गायब झाल्या असून काही ठिकाणी भंगार अवस्थेत नादुरुस्त भिंतीला टांगून ठेवण्यात आल्या आहेत. राज्य एसटी कामगार संघटनेने सुद्धा एसटी महिला कर्मचाऱ्यांच्या प्रतीक्षागृहात महिला कर्मचाऱ्यांसाठी वेंडिंग मशीन लावण्याची मागणी त्याचवेळी केली होती. मात्र, त्याकडे एसटी प्रशासनाने अद्याप लक्ष दिले नसल्याचा आरोप राज्य एसटी कामगार संघटनेच्या महिला पदाधिकारी शीला नाईकवाडे यांनी केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: उदयनराजेंच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी कराडमध्ये दाखल

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT