मुंबई

शहापूर-किन्हवली रात्रपाळीची बसफेरी पूर्ववत

CD

किन्हवली, ता. ५ (बातमीदार) : शहापूर-किन्हवली मार्गावरील राज्य परिवहन मंडळाची काही काळ बंद केलेली रात्रपाळीची बससेवा प्रवाशांच्या मागणीनुसार पुन्हा पूर्ववत सुरू झाली आहे. प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन शहापूर आगाराने केले आहे. शहापूर-किन्हवली मार्गावरील २५ वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेली; मात्र कोरोना काळात दीड वर्ष बंद झालेली रात्रीची बससेवा पुन्हा सुरू करण्यात यश आले आहे.
शहापूर-किन्हवली बससेवा पूर्ववत सुरू व्हावी म्हणून किन्हवली येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष प्रदीप शहा यांनी राज्य परिवहन मंडळाच्या शहापूर बस आगार व्यवस्थापक, ठाणे कार्यालयातील विभाग नियंत्रक यांना वारंवार भेटून निवेदने दिली होती; तरीसुद्धा सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने शहा यांनी मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांची भेट घेऊन बस सुरू करण्याबाबत विनंती केली होती.
आमदार कथोरे यांनी तातडीने ठाणे विभाग नियंत्रक यांना पत्रव्यवहार करून ही बससेवा त्वरित सुरू करावी व तसे अवगत करावे, असा इशारा दिला होता. रात्री उशिरा कामावरून परतणारे किन्हवली परिसरातील चाकरमानी, व्यावसायिक व सकाळी पहाटे मुंबईला जाणारे नोकरदार यांच्यासाठी फारच उपयोगी असलेली ही बससेवा पूर्ववत सुरू झाल्याने आगार व्यवस्थापक एस. टी. सूर्यवंशी यांना प्रवाशांनी धन्यवाद दिले आहेत. प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे शहापूर बस आगाराने आवाहन केले आहे.

----------------
अशी असेल बसची वेळ
शहापूर-किन्हवली रात्रीची बसफेरी बुधवारपासून (ता. १) पुन्हा सुरू केली आहे. रात्री ११ वाजता ही गाडी शहापूरहून किन्हवलीकडे मार्गस्थ होईल व रात्री मुक्काम करून पहाटे ४ वाजता किन्हवलीहून शहापूर-आसनगावकडे रवाना होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND: दुसऱ्या T20I सामन्यातील भारताच्या पराभवानंतर गौतम गंभीरचं सूर्यकुमारसोबत वाजलं? Viral Video मुळे चर्चेला उधाण

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी घेतली मृत डॉक्टर युवतीच्या कुटुंबियांची भेट; ''राजकारण करण्यापेक्षा सर्वांनी एकजुटीने लढा...''

Georai News : बीडच्या गेवराईत रहात्या घरातच युवकाने गळफास घेऊन जीवन संपविले; कारण अस्पष्ट

Parner News : वाळू वाहतुकदारास दंड करणा-या अधिकाऱ्यांकडूनच १५ लाख ५१ हजार रुपये दंड वसूल केला जाणार

Akola News : बीपी तपासायला सांगताच घातला गोंधळ, उपचार सुरु असतानाच रुग्णाच्या कुटुंबियांचा डॉक्टरांवर हल्ला, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT