मुंबई

कल्याण खाडीकिनारी ‘टी-८०’ युद्धनौका दाखल

CD

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली, ता. ६ : भारतीय नौदलात २३ वर्षे सेवा देत पराक्रमी शौर्याचे प्रतीक म्हणून ओळखली जाणारी टी-८० ही युद्धनौका आता छत्रपती शिवाजी महाराज आरमाराच्या प्रतिकृतीची शान वाढविणार आहे. कल्याण खाडीकिनारी ही युद्धनौका दाखल झाली आहे. शिवाजी महाराजांनी कल्याण खाडीकिनारी आपल्या पहिल्या आरमाराची स्थापना केली होती. हा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिका स्मार्ट सिटी अंतर्गत दुर्गाडी किल्ल्याजवळ २.५ किमी लांबीचा नदी किनारा व नौदल संग्रहालय विकसित करण्यात येत आहे. ही युद्धनौका याचाच एक भाग असून, नौदल आरमाराची प्रतिकृती उभारली जात नाही तोपर्यंत या युद्धनौकेचे संरक्षण करण्याचे आव्हानदेखील पालिका प्रशासनासमोर आहे.

कल्याण शहराचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी शिवरायांचे कर्तृत्व, दूरदृष्टी आणि पराक्रमाची साक्ष म्हणून कल्याण खाडीकिनारी नौदल स्मारक केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानांतर्गत उभारले जात आहे. याअंतर्गत दुर्गाडी किल्ल्याजवळ २.५ किमी लांबीचा नदी किनारा सुशोभित व नौदल संग्रहालय उभारले जाणार आहे. याठिकाणी लॅंड स्कॅपिंग, सायकल ट्रॅक, जॉगिंग ट्रॅक, दुर्गाडी किल्ल्याजवळ बगीचा विकसित करणे, लहान मुलांसाठी प्ले एरिया, पार्किंग, आरमार प्रतिकृती संग्रहालय उभारले जाणार आहे. यासाठी केंद्र सरकारचा ५० टक्के निधी, राज्य व पालिका प्रशासनाचा प्रत्येकी २५ टक्के निधी खर्च केला जाणार आहे. जानेवारी २०२४ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचा मानस आहे.

कल्याणच्या दुर्गाडी सागरी किल्ल्याजवळ भारतीय नौदलाची निवृत्त फास्ट अटॅक क्राफ्ट टी-८० ही युद्धनौका स्मारक म्हणून प्रदर्शित करण्यासाठी भारतीय नौदल आणि एसकेडीसीएल यांच्यात
नोव्हेंबर महिन्यात सामंजस्य करार झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा नौदलाच्या स्थापनेच्या ३६५ व्या वर्धापन दिनानिमित्त हा करार करण्यात आला. त्यानुसार ही युद्धनौका कल्याणच्या खाडीकिनारी विराजमान झाली. गुरुवारी मुंबई कुलाबा येथील नौदलाच्या डॉकयार्डमधून जलमार्गाने ही युद्धनौका कल्याण येथे आणण्यात आली आहे. यावेळी रिअर ॲडमिरल ए. एन. प्रमोद, कमांडर जीलेट कोशी, केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, तत्कालीन केडीएमसी आयुक्त आणि विद्यमान राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, शहर अभियंता अर्जुन अहिरे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

टी-८० चा पराक्रम
इनफॅक-टी-८० ही युद्धनौका ७ ऑक्टोबर २०२१ रोजी २३ वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झाली. इस्रायल येथे मेसर्स आयएएल रामता या कंपनीने बांधलेले हे जहाज २४ जून १९९८ रोजी कार्यान्वित करण्यात आले. ही नौका विशेषतः उथळ पाण्यातील मोहिमांसाठी तयार करण्यात आली होती. मुंबई-हाय ऑफशोअर डेव्हलपमेंट एरिया आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीला सुरक्षा प्रदान करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गस्त घालण्याचे काम या नौकेने केले आहे.

सुरक्षिततेचे आव्हान
स्मारक उभारणीच्या कामास अद्याप एक वर्ष बाकी असून तोपर्यंत खाडी किनारी उभ्या असणाऱ्या या युद्धनौकेचे संरक्षण करणे ही मोठी जबाबदारी पालिका प्रशासनावर असणार आहे. सध्या युद्धनौका चारही बाजूने पत्रे ठोकून सुरक्षित करण्यात येत आहे. मात्र, गणेश घाट परिसरात आजूबाजूला असलेल्या मोकळ्या मैदानात अनेक गर्दुल्ले, भिकारी रात्रीच्या वेळेस येतात. हा परिसर निर्जन असल्याने येथे सातत्याने प्रशासनास देखरेख करावी लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT