मुंबई

खारघरमध्ये कांदळवनांच्या कत्तली

CD

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ६ : मत्स्य शेतीच्या नावाने दिवसाढवळ्या खाडी किनारपट्टीवर असणारी कांदळवने जाळण्याचे सत्र खारघर परिसरात सुरू आहे. सायन-पनवेल महामार्गालगत असणाऱ्या खाडीकिनारी खारघरजवळ काही दिवसांपासून अज्ञात लोकांकडून कांदळवनांवर रसायने टाकून जाळण्याचा सपाटा लावला आहे. मत्स्य निर्मितीसाठी तलावात खाडीचे पाणी खेचण्यासाठी तलाव करून पर्यावरणाची हानी करण्याचे काम वेगाने सुरू आहे.

सायन-पनवेल महामार्गाच्या एका बाजूला खाडीकिनारी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे या परीसरातील कांदळनांवर नियंत्रण आले आहे. या भागातील बेकायदा मत्‍स्य शेती करणारे आता खारघर आणि रोडपाली परिसरातील खाडी भागाकडे वळले आहेत. खाडीच्या आतील भागातील कांदळवने मारून त्याठिकाणी होणाऱ्या मोकळ्या जागेवर खड्डे केले जातात. या खड्ड्यांमध्ये भरतीचे पाणी आले की, त्या पाण्यामध्ये मासळीचे उत्पादन घेऊन शेजारच्या बाजारपेठांमध्ये विक्री करणे सोयीचे जाते. त्यासाठी खारघरजवळील खाडी परिसर मोक्याचे ठरत आहे. सध्या खारघर टोलनाक्याच्या शेजारच्या कांदळवनांमध्ये आणि याठिकाणाहून पोलिस आयुक्तालयाच्या शेजारच्या खाडीकिनारी मोठ्या प्रमाणात कांदळवनांवर घातक रसायनांचा मारा करून कांदळवने जाळण्याचा प्रयत्न झाला आहे. रसायने टाकल्यानंतर येथील हिरवीगार कांदळवने काळी पडून आपोआप जळून जात आहेत. आता येथील कांदळवने सुकून गेल्याने आतमध्ये मोकळा परिसर निर्माण झाला आहे.

पर्यावरणप्रेमींकडून नाराजी
खारघर खाडी परिसरातील मागील काही दिवसांपासून अतिक्रमण केले जात आहे, ते पाहता येथील कांदळवनांबाबत अनेकदा पर्यावरण प्रेमींकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. तसेच वनविभागाकडे पत्र व्यवहारसुद्धा केला आहे. मात्र त्या पत्रावर तात्पुरती कारवाई केल्यानंतर पुन्हा कांदळवने नष्ट करण्याचे सत्र सुरू होत असल्याने पर्यावरणप्रेमींकडून नाराजी व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI: विराट कोहली अन् शुभमन गिल यांच्यात 'कड्याकाचं' भांडण? स्टार फलंदाज कर्णधाराला बोट दाखवत बडबडला Video Viral

मुंबईत विसर्जन मिरवणुकीत भरधाव कार घुसली, गणपतीच्या ट्रॉलीला धडक देत 4 जणांना उडवलं; घटनास्थळाचा VIDEO

सौंदर्य अन् बुद्धिमत्तेचा संगम! वयाच्या २३व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक करून बनली IFS अधिकारी, कोण आहे तमाली साहा?

Asian Games 2026 : अडखळला, पडला... पण जिद्दीने शर्यत पूर्ण करून भारताचा ४४ वर्षांचा दुष्काळ संपवला! कोण आहे सावन बरवाल?

Satara DJ Dolby Action : पोलिसांची कारवाई चुकीचीच! साताऱ्यात डीजे जप्त झाल्यानंतर उदयनराजेंनी थेट घेतली डॉल्बी चालकांची बाजू; पालकमंत्री देसाईंची भूमिका काय?

SCROLL FOR NEXT