मुंबई

परुळेकर महाविद्यालयात मासिक धर्म समुपदेशन

CD

कासा, ता. ९ (बातमीदार) : तलासरी येथील कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर कला, वाणिज्य महाविद्यालयाच्या महिला विकास कक्षातर्फे प्राचार्य डॉ. बी. ए. राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली मासिक धर्म या विषयावर समुपदेशन कार्यशाला आयोजित करण्यात आली होती. हा कार्यक्रम जिओ लाईफ या अग्रोटेक मुंबई कंपनीच्या सीएसआर प्रकल्पांतर्गत पार पडला. या कार्यक्रमास जिओ लाईफ ॲग्रोटेक कंपनी मुंबईच्या युथ क्लब ग्रुपच्या सदस्य श्रिया शेवाळे व पूर्वा देसाई मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शकांनी सर्वप्रथम मुलींसोबत मनमोकळेपणाने संवाद साधण्यासाठी त्यांची ओळख करून घेतली. त्यानंतर त्यांनी मासिक धर्माविषयी प्राथमिक माहिती दिली. त्याचबरोबर मासिक पाळीच्या संदर्भात निर्माण होणारे विविध प्रश्न, समस्या, त्या काळात मुलींनी कोणती काळजी घ्यावी, त्याबद्दलचे समज, गैरसमज तसेच या आधुनिक काळात वापरल्या जाणाऱ्या आधुनिक साधनांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. रंजन शनवार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महिला विकास कक्षाच्या प्रा. हर्षाली दुबला, प्रा. सुजाता गावित, प्रा. शेफाली गहला, प्रा. अनवरी खान, प्रा. कमलेश माळी, इतर प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT