मुंबई

अंबरनाथमध्‍ये पालिका इमारतीच्‍या कामाचा आढावा

CD

अंबरनाथ, ता. ८ (बातमीदार) : अंबरनाथ नगरपालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारत आणि नाट्यगृहाच्या कामाचा आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी आढावा घेतला. नगरपालिका मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी त्यांना दोन्ही प्रकल्पांच्या कामाची माहिती दिली.
अंबरनाथ पालिकेच्या माध्यमातून जुन्या नगरपालिका कार्यालयानजीक नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम सुरू आहे, तसेच सर्कस ग्राऊंडवर नाट्यगृहाचे बांधकाम सुरू आहे. नाट्यगृहाच्या कामाचा वेग समाधानकारक असून, प्रशासकीय इमारतीच्या कामाला वेग देण्याच्या सूचना आमदार किणीकर यांनी दिल्या. मंगळवारी आमदार डॉ. किणीकर यांनी पालिका मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांच्यासह प्रशासकीय इमारतीची पाहणी केली. माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, माजी नगरसेवक अब्दुल शेख, सुभाष साळुंके आदी यावेळी उपस्थित होते. प्रशासकीय इमारतीचे काम अंतिम टप्प्यात असले तरी या ठिकाणी पालिकेतील सर्व खात्यांची कार्यालये सामावून घेण्याची क्षमता नसल्याने वाढीव दोन मजल्यांच्या प्रस्तावाबाबत पाठपुरावा करणार असल्याचे आमदार किणीकर यांनी स्पष्ट केले. या प्रशासकीय इमारतीच्या कामाला निधी कमी पडू दिला जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले. वाढीव दोन मजल्यांचे काम त्वरित पूर्ण करून नव्या इमारतीमध्ये सर्व कार्यालये स्थलांतरित करण्याच्या सूचना त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिल्या. यासोबतच प्रवेशद्वारासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवण्याबाबत निर्णय घेऊन तो प्रस्ताव देखील सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्याच्या सूचना केल्या. प्रशासकीय इमारतीनंतर नव्याने उभारल्या जाणाऱ्या नाट्यगृहाच्या कामाची पाहणी केली. नाट्यगृहाच्या कामाला वेग चांगला असून, नाट्यगृहाची इमारत लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचनादेखील त्यांनी दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DGGIचा कारभार विकृत आणि मनमानी! कारवाई रद्द करा अन् जप्त रोकड व्याजासह परत द्या; मुंबई हायकोर्टानं फटकारलं

Latur Highway Safety Issue: किल्लारी राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचा धोका वाढला; संरक्षणभिंत व पथदिव्यांची नागरिकांची मागणी

Nashik News : सिलिंडरबाबत अफवा पसरवाल तर सावधान! नाशिक प्रशासनाचा कडक कारवाईचा इशारा

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गॅस मिळवण्यासाठी नागरिकांच्या लागल्या रांगा

लव्ह बर्ड.. मांजर अन् कोयत्याने वार ! पुण्यात शेजाऱ्यांमध्ये जुंपली, प्रकरण पोलीस ठाण्यात; बातमी वाचून डोक्यावर माराल हात

SCROLL FOR NEXT