मुंबई

छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिवलला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद!

CD

चेंबूर, ता. ८ (बातमीदार) ः छत्रपती शिवाजी महाराज पार्क ऐतिहासिक स्थळाच्या कलेच्या माध्यमातून गौरव करण्याकरिता शिवसेना नेते व युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून २ ते ५ फेब्रुवारीदरम्‍यान छत्रपती शिवाजी महाराज आर्ट फेस्टिवलचे दादर येथील वनिता समाज सभागृहात आयोजन करण्यात आले होते. दर्जेदार कला कौशल्य, इतिहास, खाद्य संस्कृती आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमाचा समावेश असलेल्या या सोहळ्याला मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.
पहिल्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेली गोधडीची कलाकृती या फेस्टिवलचे प्रथम आकर्षण ठरले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्पर्शाने पावन झालेली कवड्याची माळ, छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळी पाडलेली सुवर्ण होन नाणी, छत्रपती शिवाजी महाराजांची समकालीन परदेशी चित्रकारांनी काढलेली व सध्या जर्मनी, फ्रान्स, रशिया व इंग्लंड देशामधील मूळ चित्रांच्या प्रतिमा प्रथमच मुंबईकरांना पाहता आल्‍या. या भव्य कला महोत्सवाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, शिवसेना नेते व युवा सेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, शिवसेना नेते दिवाकर रावते आदी मान्‍यवर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

Latest Marathi News Update : राज्यासह देशभरात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Pune News: पुण्यातील कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा; भूसंपादनासाठी पालिकेकडून १३६ कोटींचा निधी, एप्रिलअखेर प्रक्रिया पूर्ण होणार!

भर उन्हाळ्यात पाणीपुरवठा योजनांवर गंडांतर; चार हजार योजनांकडे १४८ कोटींची थकबाकी; आता कनेक्शन कापणार?

Junnar News : जुन्नरमध्ये इंधन टंचाई; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

SCROLL FOR NEXT