मुंबई

स्वच्छतेविषयक संदेशांसाठी रंगांची उधळण

CD

नवीन पनवेल, ता. ८ (वार्ताहर)ः पनवेल पालिकेने स्वच्छ सर्वेक्षणासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्या अनुषंगाने पालिका क्षेत्रातील मुख्य मार्गांवरील दर्शनी असलेल्या भिंतींवर स्वच्छताविषयक संदेशांमधून जनजागृती केली जात आहे. विविध कलाकृतींमुळे शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या भिंती बोलक्या झाल्याचा भास होत आहे.
स्वच्छ भारत अभियानामध्ये स्वच्छताविषयक सर्वेक्षणाअंतर्गत पनवेल महापालिकेला गौरवण्यात आले आहे. देशभरातील निवडलेल्या शहरांमध्ये पनवेल शहराचादेखील समावेश असल्यामुळे चमकदार कामगिरीसाठी पनवेल महापालिकेने पुन्हा एकदा कंबर कसली आहे. याच अंतर्गत शहरातील भिंती रंगवून संदेशांमधून जनजागृती केली जात आहे. या चित्रांमध्ये देशाच्या सैन्य दलाविषयीची माहिती तसेच पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व रेखाटण्यात आले आहे. त्यामुळे विविध रंगाच्या माध्यमातून निर्जीव असलेल्या भिंती बोलक्या झाल्याचा भास पनवेलकरांना होत आहे. शहरातील बसथांबे, बसस्थानके, उड्डाणपुलाखाली साकारलेल्या विविध कलाकृतींमुळे सौंदर्यात भर घातली आहे.
-----------------------------
पावसाळ्यातही हे रंग उठून दिसतील, असा प्रयत्न आहे. दोन महिन्यात हे काम पूर्ण केले जाणार असून मुख्य मार्गातील दुभाजकांमध्ये सुशोभित झाडेदेखील लावली जाणार आहेत.
- सचिन पवार, उपायुक्त, पनवेल महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठा बदल! युद्ध सुरू झाल्यापासून सोनं 17% कोसळलं; आजचा भाव किती?

Vardha News: लोकप्रतिनिधींना जमले नाही, ते शेतकऱ्यांनी करून दाखविले; प्रशासनाला दाखविला आरसा, ३० वर्षांनतर हिवरा-पिपरा पांदण रस्त्यावर धावली चारचाकी

MS Dhoni ruled out: महेंद्रसिंग धोनी दोन आठवड्यांसाठी IPL 2026 मधून बाहेर; CSK ला पहिल्या सामन्याआधी मोठा धक्का

Illegal Infant Disposal Case : आक्काताई लावत होती मृत अर्भकाची विल्हेवाट, नातेवाईकांनी नकार दिल्यास थेट उघड्यावर अर्भक फेकायचे; पेशंटचीही होणार चौकशी

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो रिक्षासाठी LPGचा पुरवठा कमी

SCROLL FOR NEXT