मुंबई

सुकन्या योजनेसाठी आज विशेष मेळावा

CD

विक्रमगड, ता. ८ (बातमीदार) : सर्वाधिक व्याज देणारी व मुलींचे भविष्य उज्ज्वल करणारी सुकन्या समृद्धी योजनेत सहभागी होऊन अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन भारतीय टपाल विभागाने केले आहे. यासाठी ८ व ९ फेब्रुवारी २०२३ रोजी पालघर विभागात सर्व टपाल कार्यालयांत विशेष मेळाव्यांच्या माध्यमातून अधिकाधिक सुकन्या समृद्धी योजनेची खाती उघडली जाणार आहेत.
शून्य ते दहा वर्षे वयोगटातील मुलींसाठी ही योजना भारत सरकारने सुरू केली आहे. सर्वाधिक व्याजदर देणारी व अवघ्या २५० रुपयांपासून खाते सुरू करणारी ही योजना आहे. वर्षाला कमीत कमी १००० रुपये व जास्तीत जास्त दीड लाख रुपये गुंतवणूक करण्याची मर्यादा ठेवण्यात आली असून ७.६ टक्के चक्रवाढ दराने व्याज या खात्यात जमा होणार आहे. १४ वर्षे या खात्यावर खातेदारांना पैसे भरावे लागतात. त्यानंतर २१ व्या वर्षी खातेदारास मुद्दलसह चक्रवाढ व्याजाने जमा झालेली खात्यावरील सर्व रक्कम मिळते. आपल्या जवळच्या टपाल कार्यालयात जाऊन या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालघर विभागाचे डाक अधीक्षक विनोद तळेकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

Manchar Crime : मंचरमध्ये तरुणीला कालव्यात ढकलण्याची धक्कादायक घटना; आरोपी तरुण अटकेत, एनडीआरएफकडून तीव्र शोधमोहीम

SCROLL FOR NEXT