मुंबई

चोंढे परिसरात बिबट्याची दहशत

CD

किन्हवली, ता. ८ (बातमीदार) : शहापूर तालुक्यातील चोंढे परिसरात दहा दिवसांपासून बिबट्याची दहशत पसरली असून, आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांचे पशुधन फस्त करण्‍यात आले आहे. नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून वनविभागाने रात्रीची गस्त वाढवून सावधानता बाळगण्याचे आवाहन केले आहे.
सह्याद्रीच्या कुशीत घनदाट जंगलात असलेल्या चोंढे गावात गेल्या दहा दिवसांपासून बिबट्याच्या दहशतीने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. २८ जानेवारीला परिसरात असलेल्या मोहवाडी येथील योगेश ठाकरे यांच्या मालकीची डोबरमॅन जातीची मादी, ३१ जानेवारीला मधुकर धुपारी यांच्या शेतात चरायला गेलेल्या तीन शेळ्या, २ जानेवारीला रात्री वेळोशी फाट्यावरील अण्णा फार्महाऊसमधील दोन टर्की जातीच्या कोंबड्या, दोन बदके यांची अंधाराचा फायदा घेत बिबट्याने शिकार केली. काही गुराख्यांना जंगलात अधूनमधून बिबट्या दिसल्याच्या चर्चाही होत असून चोंढे परिसर बिबट्याच्या भीतीने पुरते हादरला आहे.
सावधानतेचा इशारा
वन विभागाचे साकुर्ली परिमंडळातील वनपाल जयवंत फर्डे आणि सहकाऱ्यांनी रात्रीची गस्त वाढवली असून, नागरिकांना मार्गदर्शक सूचना देऊन सावधान राहण्याचा इशारा दिला आहे. जंगलात जागोजागी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याने मात्र बिबट्याचे छायाचित्र अजून टिपलेले नाही.
-------------------------------
वन विभाग ‘ॲक्शन मोड’वर
साकुर्ली परिमंडळातील वाड्या-वस्त्यांवर वनकर्मचारी प्रत्यक्ष जाऊन बिबट्याच्या दहशतीबाबत जनजागृती मोहीम राबवित आहेत. बिबट्यापासून संरक्षण कसे करावे, यासाठी नागरिकांना मार्गदर्शन करत आहेत. मनातील भीती व संभाव्य हल्ले रोखण्यासाठी शहापूर वनविभागाचे उपवनसंरक्षक सचिन रेपाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक उपवनसंरक्षक भाग्यश्री पोळ यांच्या सूचनेनुसार डोळखांब वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत निकाळजे, साकुर्ली वनपाल जयवंत फर्डे, चार वनरक्षक, रखवालदार, फायर वाचर्स आदी बिबट्याबाबत ‘ॲक्शन मोड’वर असून मूहवाडी, बोरवाडी, चोंढे कॉलनी, बनाचीवाडी तसेच कुंडाचीवाडी आदी भागात छुपे कॅमेरे लावले आहेत.
--------------------------------------------

बिबट्याने ठार केलेली डोबरमॅन जातीची मादी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जीव दे म्हटलं म्हणून एखाद्याने खरंच जीवन संपवलं तर काय? हायकोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

Instagram Algorithm : इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल; ओरिजिनल कंटेंट होणार प्रमोट.. मात्र यूजर्सचं टेन्शन वाढणार!

Namrata Sambherao: "महाराष्ट्राची लाडकी नमा..."; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरनं नम्रता संभेरावला लिहिलं खास पत्र

Viral Video: खिशात खेळण्यातली पिस्तूल सापडल्यानंतर पकडले कान, मुंबई मेट्रो स्टेशन वरील चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : कल्याणमधून श्रीकांत शिंदे अर्ज भरणार, जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी

SCROLL FOR NEXT