मुंबई

अंबरनाथकरांना पुस्तक भेट

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ८ : वाचनाची सवय अनेकांना असते; पण आपल्याला पाहिजे ती पुस्तके मिळत नाहीत. त्यातही आपल्या शहरातील लेखक, कवी, पत्रकारांनी लिहिलेल्या पुस्तकांचा खजिना क्वचितच उपलब्ध होतो. अशा चोखंदळ वाचकांसाठी अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी ९ फेब्रुवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत पुस्तक भेट हा उपक्रम आयोजित केला आहे.
९ फेब्रुवारी सकाळी साडेदहा वाजता अंबरनाथ हुतात्मा चौक येथे हा कार्यक्रम होणार आहे. अंबरनाथमधील लेखक स्व. अरुण मैड, किरण येले, हेमंत गोगटे, गिरीश त्रिवेदी, प्रवीण कारखानीस, प्रशांत असलेकर, सर्जेराव सावंत, राजेंद्र सूर्यवंशी अशा अनेक लेखकांचे कथासंग्रह, कवितासंग्रह, कादंबरीचे वितरण करणार आहोत. या वेळी आमदार डॉ. बालाजी किणीकर, माजी उपनगराध्यक्ष अब्दुल शेख, सुभाष साळुंखे, प्रज्ञा बनसोडे, उमेश गुंजाळ, संदीप लोटे, रवी करंजुले, रवी पाटील, सुनील सोनी, मारुती डोंगरे, चंद्रकांत भोईर, शैलेश भोईर, रोहित सोमेश्वर, विकास सोमेश्वर, निशान पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे निमंत्रक निखिल चौधरी यांनी सांगितले. या उपक्रमात शहरातील लोकांनासुद्धा सहभागी होता येणार आहे. आपल्याकडे असणारी पुस्तके जी वाचलेली आहेत आणि ती या उपक्रमात दान करण्याचे आवाहनही आयोजक सुनील चौधरी यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price Crash : सोनं-चांदी स्वस्त झालं की गुंतवणूक बुडाली? 24 दिवसांत किमतीत तब्बल 60 हजारांची घसरण; काय घडतंय बाजारात? गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले

US Iran War Victory : अमेरिकेने युद्ध जिंकल्याचा ट्रम्प यांचा दावा, म्हणाले- इराणने आम्हाला मोठं गिफ्ट पाठवलं

Latest Marathi News Live Update : 'आप'चे आमदार पठाणमाजरा यांना ग्वाल्हेरमधून अटक

Hotel Close Ratnagiri : रत्नागिरीत २५० हॉटेलचे ‘शटर बंद’, शिवभोजन थाळीही बंद सर्वसामान्यांची फरफट

IPL 2026: मुंबईत सर्व IPL कर्णधारांची बैठक; इम्पॅक्ट खेळाडू, आचारसंहिता आणि नवीन नियमांची चर्चा होणार

SCROLL FOR NEXT