मुंबई

मिरा-भाईंदर महापालिकाच चालवणार नाट्यगृह

CD

भाईंदर, ता. ८ (बातमीदार) : मिरा-भाईंदर महापालिकेचे लता मंगेशकर नाट्यगृह कोणी चालवायचे याबाबतचा संभ्रम दूर झाला आहे. हे नाट्यगृह महापालिका स्वत:च चालवणार आहे. तसेच त्यात केवळ नाटक, सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच चित्रिकरणासाठी परवानगी दिली जाणार आहे. त्याव्यतिरिक्त लग्न, मुंज अथवा वाढदिवस यांसारख्या अन्य कोणत्याही कारणासाठी नाट्यगृह न देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नाट्यगृहाचे लोकार्पण करण्यात आले होते. त्यानंतर तब्बल चार महिन्यांनी ते चालविण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय महापालिकेने घेतला आहे. सुरुवातीला हे नाट्यगृह विकसकाच्या माध्यमातून चालविण्याबाबत विचार करण्यात येत होता. मात्र त्याला राजकीय विरोध झाला. नाट्यगृह महासभेच्या निर्णयाप्रमाणे महापालिकेनेच चालवावे, असा पवित्रा भाजपने घेतला होता. अखेर नाट्यगृह महापालिकेने स्वत:नेच चालविण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे.
नाट्यगृहात सर्व भाषिक नाटकांचे प्रयोग आयोजित करण्यासंदर्भातील भाड्याचे दर देखील निश्चित करण्यात आले आहेत. हे दर नाट्यप्रयोगासाठी आकारण्यात येणाऱ्‍या तिकिटाच्या दरानुसार व नाटक कोणत्या सत्रात आयोजित केले जाणार आहे त्यानुसार असणार आहेत. शनिवार, रविवार तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी त्याचे दर वेगळे असणार आहेत. या वास्तूत असलेल्या छोट्या नाट्यगृहासाठीदेखील याच पद्धतीने दर आकारण्यात येणार आहेत. मराठी नाटकांसाठी तिकिटाच्या दरानुसार भाडे न आकारता त्यासाठी विशेष सवलतीचे दर आकारण्यात येणार आहेत. त्यानुसार मराठी नाटकांना सकाळी ८ ते ११ व दुपारी १२ ते ३ या प्रत्येक सत्रासाठी ४००० व सायंकाळी ४.३० ते ७ व रात्री ८.३० ते ११.३० या प्रत्येक सत्रासाठी ८००० रुपये भाडे आकारण्यात येणार आहे; तर छोट्या नाट्यगृहासाठी अनुक्रमे ३००० व ६००० रुपये भाडे निश्चित करण्यात आले आहे. नाट्यसंस्थांना नाटकाच्या सरावासाठीदेखील नाट्यगृहातील रंगमंच भाड्याने देण्याचे दर ठरविण्यात आले आहेत. त्यानुसार मोठ्या नाट्यगृहातील फक्त रंगमंचासाठी २० हजार रुपये व छोट्या नाट्यगृहातील रंगमंचासाठी १५ हजार रुपये भाडे आकारण्यात येणार आहे.
मोठे नाट्यगृह संपूर्ण दिवसासाठी हवे असल्यास ५० हजार रुपये व अर्ध्या दिवसाठी हवे असल्यास ३५ हजार रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच छोट्या नाट्यगृहासाठी अनुक्रमे २५ हजार व १५ हजार रुपये भाडे निश्चित करण्यात आले आहे. मालिका चित्रिकरणासाठी व अन्य कार्यक्रमांसाठी रात्री १० नंतर १० हजार रुपये भाडे आकारण्यात येणार आहे. या सर्व दरांवर जीएसटी स्वतंत्रपणे आकारला जाणार असून दरात दरवर्षी पाच टक्के वाढ केली जाणार आहे.

कर्मचाऱ्यांची नियुक्ती
नाट्यगृह महापालिकेकडूनच चालविण्यात येणार असल्याने त्यासाठी व्यवस्थापक, लिपिक व शिपाई आदी कर्मचाऱ्‍यांची नियुक्ती केली जाणार आहे. तसेच नाट्यगृहातील विविध यंत्रणांची देखभाल-दुरुस्ती, साफसफाई व सुरक्षा व्यवस्था आदीसाठी खासगी संस्थेची नेमणूक करण्यात येणार असून त्यासाठी लवकरच निविदा काढली जाणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव आयुक्त दिलीप ढोले यांनी नुकताच मंजूर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News : कल्ला होणार... CSK संजू, सर्फराज यांच्यासह ५ खेळाडूंना पदार्पणाची संधी देणार, आयपीएल गाजवणार

IDBI बँकेत १३०० पदांसाठी मोठी भरती; पदवीधर उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

वृद्ध, दिव्यांग कर्मचाऱ्यांचा त्रास कमी होणार, कार्यालयांत विशेष सुविधा मिळणार; पालिकेचा महत्त्वाचा निर्णय

MLA Randhir Savarkar: शेतकऱ्यांच्या पीक कर्ज फेडीची मुदत ३० जूनपर्यंत वाढवावी: आमदार रणधीर सावरकर, अन्याय दूर करा!

Sanju Samson 0.32s Video: संजू सॅमसनचा 'हा' Video का झालाय व्हायरल? लोकेश राहुलने हाक मारली, सुरुवातीला तो पुढे निघून गेला अन्...

SCROLL FOR NEXT