मुंबई

ग्रामीण भागातही व्हॅलेंटाईन आठवड्याची धूम !

CD

जव्हार, ता. ८ (बातमीदार) : प्रेम या अडीच अक्षरांच्या शब्दात प्रत्येकाचे आयुष्य सामावलेले असते. नाते कोणतेही असो, नात्याचा मूळ पाया हा प्रेमावर अवलंबून असतो. फेब्रुवारी महिन्याला सुरुवात झाली की तरुणाईला ‘व्हॅलेंटाईन डे’चे वेध लागतात. मात्र व्हॅलेंटाईनच्या आधी व्हॅलेंटाईन वीक साजरा केला जातो. केवळ व्हॅलेंटाईन डेच नाही, तर इतर दिवस ही महत्त्वाचे गणले जातात. जव्हारसारख्या ग्रामीण भागातही शहरातील महाविद्यालयांप्रमाणे अनेक प्रकारचे डेज महाविद्यालयीन स्तरावर साजरे करण्यात येत आहेत. हे सर्व डे साजरे करत असताना विद्यार्थी आपला आनंद मित्र-मैत्रिणींसोबत साजरा करीत आहेत.
फेब्रुवारी महिन्याच्या ७ ते १४ या दरम्यान वेगवेगळे डे साजरे करण्यात येतात. प्रेमाचे नाते अधिक घट्ट करण्यासाठी व्हॅलेंटाईन वीक साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन वीक हा विशेष आठवडा केवळ जोडप्यांकडूनच साजरा केला जात नाही, तर आपल्या प्रेमाच्या आवडीच्या व्यक्तीबद्दल आपल्या भावना, आदरही अनेक जण व्यक्त करत असतात. त्यातून प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी व्यक्त केली जात असते. विशेष म्हणजे अनेक जण हा आठवडा मोठ्या उत्साहात साजरा करतात. व्हॅलेंटाईन वीक सुरू असल्याने तरुणाईमध्ये उत्साहाचे वातावरण असते. त्यामुळे व्हॅलेंटाईन वीक साजरा करण्यासाठी तरुण वर्गाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे.
..
व्हॅलेंटाईन वीकसाठी बाजारपेठ सज्ज
व्हॅलेंटाईन वीकची तरुण वर्गाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. तसेच व्हॅलेंटाईन डे साठी बाजारपेठही सज्ज झाली आहे. बाजारपेठेत व्हॅलेंटाईनसाठी खास गिफ्ट, टेडी, चॉकलेट, रोझ यांनी बाजारपेठ सजली आहे.
...
९ फेब्रुवारी : चॉकलेट डे
१० फेब्रुवारी : टेडी डे
११ फेब्रुवारी : प्रॉमिस डे
१२ फेब्रुवारी : हग डे
१३ फेब्रुवारी : किस डे
१४ फेब्रुवारी : व्हॅलेंटाईन डे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT